.
४८ व्या राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेतील “ग” गटात महाराष्ट्राने दुसरा विजय मिळविताना उत्तरांचलचा ५६-१२ असा धुव्वा उडविला.
उत्तराखंड : महाराष्ट्राने साखळीत दुसरा विजय मिळवीत “४८व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” बाद फेरीत जाण्याचा आपला मार्ग सुकर केला. उत्तराखंड राज्य कबड्डी संघटनेच्या विद्यमाने पंतदिप क्रीडांगण, ऋषिकेश, हरिद्वार येथे मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील “ग” गटात महाराष्ट्राने दुसरा विजय मिळविताना उत्तरांचलचा ५६-१२ असा धुव्वा उडविला. आक्रमक सुरवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धातच २लोण देत २८-१० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम ठेवत आणखी २लोण देत प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम केले. उत्तरार्धाच्या खेळात महाराष्ट्राने २८ गुण घेतले, तर उत्तरांचलला अवघे २गुण मिळविता आले. महाराष्ट्राकडून वैभव कांबळेने ८, तर दादासो पुजारीने ६ पकडी करीत या विजयात आपला बचाव उत्कृष्ट सांभाळत महत्वाचा वाटा उचलला. तेजस काळभोरने चढाईत ९ गुण, तर शिवम पठारेने एक बोनस व ६गुण मिळवीत त्यांना उत्तम साथ दिली. म्हणूनच महाराष्ट्राला हा विजय सोपा झाला. आता महाराष्ट्राची शेवटची साखळी लढत राजस्थानशी होईल.
कुमार गटाचे अन्य निकाल संक्षिप्त : १) क गट : हरियाणा वि. वि. गोवा (३८-१९); २) इ गट : झारखंड वि.वि. त्रिपुरा (५९-११); ३) फ गट : बिहार वि.वि. गुजरात (४९-२५); ४) ग गट : राजस्थान वि.वि. छत्तीसगड (५२-२३); ५) ह गट दिल्ली वि.वि. ओरिसा (४५-२०); ६) ब गट : उत्तर प्रदेश वि.वि. जम्मू-काशमीर (४९;२०); ७) क गट : हरियाणा वि.वि. आसाम (३८-०९); ८) क गट : गोवा वि.वि. उत्तरांचल (५१-३६); ९) ब गट :- कर्नाटक वि.वि. केरळ (३९-२५).
297 total views, 1 views today