अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा सोमवारपासून

मुंबई क्रिकेट संघटनेची अधिकृत स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंचा समावेश असणाऱ्या चोवीस संघाना प्रवेश देण्यात आला आहे.

ठाणे : डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर हि स्पर्धा २१ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची अधिकृत स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंचा समावेश असणाऱ्या चोवीस संघाना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात पय्याडे स्पोर्ट्स क्लब, पारको फेणे क्रिकेटियर्स, स्पोर्टींग युनियन, कामत मेमोरियल, पालघर डहाणू तालुका स्पोर्टींग अकॅडेमी, दहिसर स्पोर्ट्स क्लब, विजय क्रिकेट क्लब, स्पोर्टींग क्लब कमिटी, सिंद स्पोर्ट्स क्लब, व्हिक्टरी क्लब, दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, साईनाथ स्पोर्ट्स क्लब,दैवेज्ञ क्रिकेट क्लब, ग्लोरियस क्रिकेट क्लब, माटुंगा जिमखाना, नॅशनल क्रिकेट क्लब, या संघांचा समावेश आहे. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून सामने साखळी आणि बाद पद्धतीने खेळवले जाणार आहेत. गत वर्षी या स्पर्धेत सोळा संघांना प्रवेश दिला होता. यावेळी आठ संघ वाढवण्यात आले. गेल्यावर्षी तळाला राहिलेले आठ संघ आणि स्पर्धेत खेळू इच्छिणाऱ्या इतर संघामध्ये बाद पद्धतीने सामने खेळवण्यात आले. त्यात पहिल्या आठ संघांना मुख्य स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आणि वैयक्तिक विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ राजेश मढवी यांनी सांगितले,

 15,053 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.