बेंगळुरू मुव्हिंगचा ‘इव्हीमायडिलीवरी’ उपक्रम

बेंगळुरू येथे इलेक्ट्रिक वाहन बांधणीचा शुभारंभ

बेंगळुरू : पूर्णपणे इलेक्ट्रिकवर इंधन आधारित असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण सेवा देणाऱ्या वाहन व्यवस्थेत (लास्ट माईल डिलिव्हरी फ्लीट्स) होणाऱ्या बदलाला गती देण्यासाठी बेंगळुरू मूव्हिंगने ‘इव्हीमायडिलीवरी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून बेंगळुरूच्या चर्च स्ट्रीटवर थक्क करणाऱ्या, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन बांधणीची सुरुवात करण्यात आली. पुनर्चक्रण साहित्याने युक्त संवादात्मक घटक जसे की थ्रोटल इंटराक्टीव्हिटी डिस्पेंसिंग गुडीज निर्मित वाहन हे भारताच्या इलेक्ट्रिक वाहन चळवळीला अधोरेखित करते.
बेंगळुरू मुव्हिंग या उपक्रमातंर्गत तीन चाकीची बांधणी करण्यात येणार असून कला आणि विज्ञानाचा हा मेळ म्हणजे डिलिव्हरी पॅकेज प्रवासाविषयी बेंगळुरूवासियांना विचार करायला भाग पाडणारा आहे. हा अनुभव अतिशय संवादात्मक आणि अदभूत असणार आहे. काही वेळातच ग्राहकांना ईव्हीला स्पर्श करून अनुभव घेता येणार आहे.
बेंगळुरू मुव्हिंग’सोबत काम करणाऱ्या कॅम्पेनर नवधा मल्होत्रा यांनी सांगितले “स्टँड. अर्थ संशोधन समुहाच्या अहवालात आढळून आले की घरपोच वितरण व्यवस्थेपायी भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन हे सुमारे २८५ ग्राम इतके असते. बेंगळुरू मुव्हिंगला आपल्या ग्राहकांची खरेदी भूक एकूण-शून्य उत्सर्जन आणि शाश्वत कृतीत खरे प्रयत्न करणाऱ्या ब्रॅंड आणि कंपनीत परावर्तित करायची आहे.”
या स्थापनेला साह्य करत असलेल्या कमिशनर ऑफ डायरक्टरेट ऑफ अर्बन लँड ट्रान्सपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकच्या व्ही मंजुळा म्हणाल्या, “#इव्हीमायडिलीवरी उपक्रमाला साह्य करताना मला आनंद वाटतो आहे आणि या संवादात्मक स्थापनेविषयी शेवटच्या मैलापर्यंत ई-कॉमर्स वितरण सेवा उपलब्ध करून देणाऱ्यांत जागरूकता वाढते आहे. तसेच २-३ चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे विषारी वायू उत्सर्जन कमी होण्यास हातभार लागेल. शहरी रस्ते वाहतूक संचलनालयाने कर्नाटकात शाश्वत वाहतूक स्वीकार आणखी अनिवार्य केला असून नागरिकांना अधिक सजग आणि कृतिशील बनवू पाहणाऱ्या अशाप्रकारच्या उपक्रमाला आमचा पाठिंबा पाहून आनंद वाटतो.”

 269 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.