पय्याडे, विजय क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

अजित घोष स्मृति महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

मुंबई : जान्हवी काटेच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर दहिसर स्पोर्ट्सचा ७५ धावांनी पराभव करत आपल्या दुसऱ्या विजयानिशी विजय क्रिकेट क्लबने अजित घोष स्मृति महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जान्हवीने ४१चेंडूत ६७ धावा फटकावल्या आणि ११ धावा ४ बळी घेत आपल्या खेळाची छाप पाडली. तिने जाग्रवी पवार (नाबाद ६६) हिच्यासह दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत संघाला ३ बाद १७१ अशी धावसंख्या उभारून दिली. दहिसर संघ उत्तरादाखल १०४ धावाच करू शकला.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित या स्पर्धेमध्ये पय्याडे स्पोर्ट्स क्लबने दुपारच्या सत्रामध्ये दुर्बल ठाणे स्पोर्टिंग क्लबचा ७ विकेटनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ स्पोर्ट्स पडेल. दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये विजय क्रिकेट क्लबला मुंबई पोलीस जिमखान्याशी लढावे लागेल. हे सामने शिवाजी पार्कवर होतील.
ठाणे संघावर तसा सहजासहजी विजय मिळाला नाही. निव्या आंब्रेने ४९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासहित ५९ धावांची केलेली खेळी आणि पय्याडेने बहाल केलेल्या अवांतर १४ धावांमुळे ठाणेकर मुलींना शंभरी पार करता आली. यामध्ये खुशी भाटिया (३९) आणि सायमा ठाकोर (नाबाद ३५) यांची भूमिका महत्त्वाची ठरली. खुशीने चारुश्री तोडणकर आणि सायमा यांच्यासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी ४१ आणि ४३ धावांच्या भरीव भागीदारी केल्या. खुशीची खेळी संयमपूर्ण होती. मात्र सायमा अधिक आक्रमक खेळली.
संक्षिप्त धावफलक : विजय क्रिकेट क्लब :२० षटकात ३ बाद १७१ (जान्हवी काटे ६७, जाग्रवी पवार नाबाद ६६) विजयी विरुद्ध दहिसर स्पोर्ट्स : २० षटकात ८ बाद १०४ ( राधिका ठक्कर २९, प्रियंका गोळीपकर ३१, जान्हवी काटे ११/४, बतुल परेरा १४/२) सामन्यात सर्वोत्तम : जान्हवी काटे
स्पोर्ट्सफील्ड: ११ षटकात ८ बाद १२७( आचल वळंजू ५०, कृतिका कृष्णकुमार २३, मनाली दक्षिणी २१, लकीशा लब्दे २२/४) विजयी विरुद्ध स्पोर्टिंग युनियन : १९ षटकात ७ बाद ९१: (सिद्धेश्वरी पागधरे २३, महक मिस्त्री नाबाद २८, समृद्धी राहुल १५/२) सामन्यात सर्वोत्तम: आचल वळंजू
ग्लोरियस सीसी :२० षटकात ५ बात ८७( रिया साळुंखे २६, करुणा सकपाळ, नाबाद २६) पराभूत विरुद्ध मुंबई पोलीस जिमखाना: १६.१ षटकात ३ बाद ९० (क्षमा पाटेकर नाबाद ५०) तन्वी परब २२)
ठाणे स्पोर्टिंग क्लब : १८ षटकात ५ बाद १०६ (रिद्धी कोटेचा १७/ २) पराभूत विरुद्ध पय्याडे क्लब: १६ षटकात ३ बाद १०९,( खुशी भाटिया ३९, सायमा ठाकोर ना.३५)

 177 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.