मनोरुग्णालय येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचा केला पहाणी दौरा

दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सध्याच्या घडीला असलेल्या रुग्णालयाच्या इमारती पाडण्यात येणार आहे. अशातच जिल्हा रुग्णल्यात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे उपचाराभवी हाल होऊ नये यासाठी मनोरुग्णालयाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय उभारण्यात येत आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागी सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मनोरुग्णालयाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर प्रमुख्य हेमंत पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समावेत मंगळवारी पाहणी दौरा केला.
दिवसेंदिवस ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. याची दाखल घेत सिव्हिल रुग्णालयाचे रुपडं पालटलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सध्याच्या घडीला असलेल्या रुग्णालयाच्या इमारती पाडण्यात येणार आहे. अशातच जिल्हा रुग्णल्यात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे उपचाराभवी हाल होऊ नये यासाठी मनोरुग्णालयाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर प्रमुख्य हेमंत पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समावेत मंगळवारी पाहणी दौरा केला. यावेळी उभारण्यात आलेल्या विभागासह, शस्त्रक्रिया विभाग, लहान मुलांचे विभाग यांची पहाणी केली. तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून घेण्यावर भर द्यावा लागणार असल्याची बाब सुधीर कोकाटे यांनी जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांचौ निदर्शनास आणून दिली. तर, डॉ. पवार यांनी देखील उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या रुग्णालयाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागचे अभियंता ही उपस्थित होते.

 64,880 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.