आनंद भारती तर्फे मैदानी खेळांचा महोत्सव

महोत्सवात रंगणार शरीरसौष्ठव, कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, खो खो स्पर्धा

ठाणे : आनंद भारती समाजातर्फे १२१ व्या आनंद भारती महाराज पुण्यतिथी- चंपाषष्ठी उत्सवानिमित्त १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मैदानी खेळांच्या क्रीडा स्पर्धांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवांतर्गत १९ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या खेळाडूंची सर्वांग सुंदर व्यायामाची प्रात्यक्षिकं होतील. २० नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हास्तरीय ४० वी आनंद श्री शरीरसौष्ठव स्पर्धा होईल. २१ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय किशोर-किशोरी गटाची लंगडी स्पर्धा रंगेल. २२ नोव्हेंबर रोजी निमंत्रितांच्या महिला गटाची कबड्डी स्पर्धा खेळवण्यात येईल. आंतरशालेय कुस्ती स्पर्धा २३ नोव्हेंबर रोजी होईल. २४ नोव्हेंबर रोजी किशोर गट, पुरुष आणि महिलांची पुरलेला आणि दोरीचा मल्लखांबाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी कुमार गटाच्या ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. या क्रीडा स्पर्धांच्या जोडीने भजन स्पर्धा, रंगावली स्पर्धा आणि प्रदर्शन, संस्थेच्या आनंद हस्तलिखिताचे प्रकाशन होणार असल्याचे संस्थेचे सचिव विवेक मोरेकर यांनी सांगितले.

 14,395 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.