डॉ. समीरा भारती यांच्यातर्फे ठामपा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बालनाट्य सादर

किशोरवयीन अवस्थेतेतील मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, कौटुंबिक आणि मानसिक गुंतागुंत या बालनाट्यातून उलगडून दाखवली गेली.

ठाणे : ‘योग्य वयात मुलांना योग्य मार्गदर्शन आणि संस्कार मिळणेतितकेच महत्वाचे आहे जितके त्यांना जगण्यासाठी श्वास घेणे महत्वाचे आहे.’ या विचाराच्या धर्तीवर आधारित संस्कारमय बालनाट्य ‘छडी लागे छम छम!’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी बालदिनाचे औचित्य साधून संदीप गचांडे लिखित, सिध्दार्थ ठाकूर दिग्दर्शित व डॉ. समीरा समीर भारती यांच्या पालवी महिला मंडळातर्फे आयोजित आणि मुक्तछंद नाट्यसंस्थेतर्फे प्रस्तुत बालनाट्य ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक१३०च्या विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.
किशोरवयीन अवस्थेतेतील मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, कौटुंबिक आणि मानसिक गुंतागुंत या बालनाट्यातून उलगडून दाखवली गेली. तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. अवघे जग मोबाईलच्या चौकटीतसामावले आहे. शिक्षणपद्धत बदलली आहे , मानसिकताही बदलली आहे आणि सोबतच मुलांना समजवण्याची व समजून घेण्याची तसेच मुलांनी कळत-नकळत केलेल्या चुकांबद्दल शिक्षा करण्याची पद्धत देखील बदलली आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीला कोणत्या प्रकारे समजावले पाहिजे याचे प्रात्यक्षिक सादरीकरण ‘छडी लागे छम छम’ या बालनाट्याद्वारे दाखवले गेले.
यावेळी ठाणे महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तेलंग मॅडम, ठाणे महापालिकेच्या काजूवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा पवार, रजनी हांडा, ज्योती कदम, रुचिता मुळंये, पालवी महिला मंडळाच्या सर्व सदस्या, रामचंद्र पाटील, वागळे इस्टेट भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष दीपेश सिंग, संजय हांडा आदी उपस्थित होते.

 147,243 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.