श्रीरंग शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद बल्लाळ

कार्याध्यक्षपदी देशमुख, प्रमोद सावंत-सचिव तर भोसले कोषाध्यक्ष

ठाणे: येथील सुवर्ण महोत्सवी श्रीरंग शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांची तर कार्याध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची बहुमताने निवड झाली आहे.
संस्थेची अलिकडेच निवडणूक झाली आणि त्यात डॉ. नमिता निंबाळकर, गणेश लाखोडे, प्रमोद सावंत, महेश भोसले, रविंद्र पालकर, विक्रांत चित्रे, गणेश मोरे, मधुकर देशपांडे, हेमंत लोखंडे,अरुंधती गुर्जर, अरुंधती लिमये, तुषार देसाई, महाबळेश्‍वर नाईक आणि अभिजीत मुरांजन हे सदस्य निवडून आले.
प्रमोद सावंत यांची सचिवपदी तर महेश भोसले यांची कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली.
कार्याध्यक्ष डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
श्रीरंग शिक्षण संस्थेच्या उज्ज्वल इतिहासाची परंपरा पुढे नेऊन नवीन योजना आणि प्रकल्प राबवून शाळेच्या लौकिकात भर घातली जाईल, असे बल्लाळ म्हणाले.

 4,253 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.