ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टीनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत बांधले शिवबंधन

उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत, आमदार प्रताप सरनाईक यांना धक्का
ठाणे : आज मातोश्री येथे ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवेत भास्कर बैरीशेट्टी व शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.
त्यावेळी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ओवळा माजीवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, रेखा खोपकर, संजय घाडीगावकर,
महिला पदाधिकारी उषा बोरुडे, स्नेहल मोरे, संजय रमेश मोरे
उपेंद्र पिंगळे, मधुसूदन विचारे, अशोक पाटील, शिवाजी वाघ, परशुराम ब्रीद, प्रताप शिर्के, विजय देठे, मधुकर गवस, चाफेकर, वामन राजगुरू, स्वप्नील चव्हाण, अजय मोरे, नारायण पायल, प्रशांत पांचाळ, दरंगे, भोसले, अमित आग्रे, विनोद तावडे, किसन कड, पोपट तांबे, दशरथ कोतवाल, संदीप सोलंकी, उमेश जाधव, जीतू रामराजे, नाना शेलार, राजेश, दत्ता, येऊर गांव – प्रतीक भालेराव, दिगंबर, स्वामी, मनोज नारकर, शेखर गांगुर्डे, अरुण खेतले, चावला आदी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 3,804 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.