ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सर्व गटांच्या निवड चाचणी स्पर्धा ११नोव्हेबरपासून रंगणार

संघटनेच्या पाच विभागात होणाऱ्या स्पर्धेतून पात्र संघ मुख्य स्पर्धेत होणार सहभागी

ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सर्व गटाच्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला” ११नोव्हेबरपासून सुरुवात होणार. ठाणे, भिवंडी, कल्याण, बदलापूर, टिटवाळा या पाच विभागात ही स्पर्धा खेळविण्यात येईल. यातील पात्र संघ मुख्य स्पर्धेत खेळातील. ठाणे विभागाची स्पर्धा ग्रीफिन जिमखाना व रा. फ. नाईक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रा.फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणात ११ते १३नोव्हेबर या कालावधीत होईल. भिवंडी विभागाची स्पर्धा उजाळा क्रीडा मंडळाच्या सहयोगाने वळगाव येथे मंडळाच्या पटांगणावर ११ ते १३नोव्हेबर या कालावधीत त्या होतील. माऊली प्रतिष्ठान व अश्वमेघ स्पोर्ट्स-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ नोव्हेबर या कालावधीत उषा नगर सोसायटीच्या बाजूला, रेल्वे वसाहती जवळ ठाकुर्ली(पू.) येथे कल्याण विभागाकरिता स्पर्धा होईल.
राज क्रीडा मंडळाच्या सहकार्याने ११ ते १३ नोव्हेबर या कालावधीत कुळगाव-बदलापूर येथील गावदेवी तलावा जवळ बदलापूर विभागाकरिता स्पर्धा होईल. तर टिटवाळा विभागाकरिता संघर्ष क्रीडा मंडळाच्या विद्यमाने १२ ते १३ नोव्हेबर या कालावधीत वक्रतुंड मैदान, वैकुंठेश्वर मंदिराच्या बाजूला, मोहणे, आंबिवली (पू.) येथे या स्पर्धा होतील. या पाच विभागातून पात्र ठरलेले संघ मुख्य स्पर्धेत सहभागी होतील. कुमार, कुमारी गटात पात्र ठरलेले संघ १५ ते १८ नोव्हेबर या कालावधीत ओम वर्तकनगर स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेत साखळी व बाद पद्धतीने खेळतील. किशोर, किशोरी गटाकरिता पात्र ठरलेले संघ १९ ते २१ नोव्हेबर या कालावधीत चिंतामणी स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेत एकमेकांना भिडतील. तर प्रिन्स इंटरप्राइजेस व जॉयकुमार युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २६नोव्हेबर ते १ डिसेंबर या कालावधीत पुरुष अ-ब व महिला पात्र संघाची स्पर्धा रंगेल. असे एका पत्रकाद्वारे ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मालोजी भोसले यांनी प्रसार माध्यमाना कळविले आहे.

 18,722 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.