ठाणे जिल्ह्याच्या प्रारुप मतदार यादीत शंभर टक्के छायाचित्रांचा समावेश

काही दुरुस्ती असल्यास मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो अर्ज भरून आपले नाव दुरुस्त करून घ्यावे – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे :  भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण ६१ लाख ३४ हजार ९५५ झाली असून यादीत शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या ३३ लाख २८ हजार ००९ इतकी असून महिला मतदारांसाठी संख्या २८ लाख ६ हजार ०९३ इतकी आहे. तर ८५३ इतर मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४३ इतके आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये वाढ झाली असून या यादीत ३१ हजार ७८ दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे.
ही प्रारुप मतदार यादी विधानसभा मतदार संघ कार्यालय, महानगरापालिका, शासकीय कार्यालयात आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो अर्ज भरून आपले नाव दुरुस्त करून घ्यावे, असेही शिनगारे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सूसुत्रिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६ हजार ३९१ मतदान केंद्रे आहेत. ही मतदान केंद्रे दिव्यांगस्नेही करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले.
मतदारयादीतील तपशिलासोबत आधार क्रमांकाची जोडणी करण्याचे आवाहन
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान मतदारांना आधार क्रमांकाची जोडणी करणेसाठी ६-ब अर्ज भरण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांक मतदारयादीतील तपशिलासोबत जोडणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप,  एनव्हीएसपी व व्होटर पोर्टल  या ऑनलाईन सुविधांचा वापर देखील करावा, असे आवाहन  शिनगारे यांनी केले.
ही आहेत मतदारयादीतील वैशिष्ट्य
१ मतदायादीतमध्ये १००% मतदारांची छायाचित्रे आहेत.
२. संपूर्ण राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इतर (तृतीयपंथी ) मतदार असुन त्यांची संख्या ८५३ इतकी आहे.
३. मतदारयादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणी वाढ. मतदायादीमध्ये लिंग गुणोत्तरामध्ये ८३८ वरुन ८४३ वाढ झाली आहे.
४. मतदारयादीमध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणीमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये एकूण ३१,०८७  दिव्यांग मतदार मतदारयादीमध्ये चिन्हांकीत.
५. ठाणे जिल्ह्यामध्ये मतदानकेंद्रांचे सुसुत्रीकरण पूर्ण. जिल्ह्यामध्ये ६३९१ इतकी मतदानकेंद्र अस्तित्वात आली आहेत. यापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये ६४८८ इतके मतदानकेंद्रे अस्तित्वात होती.
६. ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी – ५५६९.

 29,841 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.