पक्षासाठी सामान्य कार्यकर्ताही महत्वाचा

भाजपचे ठाणे शहरातील कार्यकर्ते विशाल वाघ यांच्या घरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला पाहुणचार

ठाणे : पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी सामान्य कार्यकरताही महत्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी ठाणे शहरातील भेटी दरम्यान बावनकुळे यांनी शहरातील भाजपाचे कार्यकर्ते विशाल वाघ यांच्या घरी पाहुणचार घेतला. याभेटीनंतर बावनकुळे म्हणाले सामान्य कार्यकर्ता हा पक्ष आणि मतदार यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. पक्षाचे विचार आणि कार्यक्रम मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी हा कार्यकर्ता मेहनत घेत असतो. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडणारे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद आहे. यावेळी विशाल वाघ यांनी प्रभागात पक्षाची बांधणी करण्याकरता राबवत असलेल्या उपक्रम, कार्यक्रमांची माहिती बावनकुळे यांना करुन दिली. बावनकुळे यांच्यासोबत ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटनिस ॲड. माधवी नाईक, ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की, सचिन मोरे हे उपस्थित होते. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ प्रभागात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात.
आयु.भाई सोनावणे,आयु.राहुल मोरे,आयु.शरद सोनावणे,आयु.राजेश गाडे,आयु.शरद जगदाळे,आयु.वैभव सोनावणे,आयु.सचिन मोते,आयु.विजय जाधव,संघर्ष महिला मंडळ,रमाआई महिला मंडळ,उन्नती महिला मंडळ यांच्यासह नागसेन नगर,खारटन रोड आणि महागिरी परिसरातील सर्व समाजाच्या नागरिकांनी बावनकुळे यांचे स्वागत केले.

 21,731 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.