सीआयएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर रनिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम ०.४ सेकंदाने हुकला
ठाणे : पुण्यातील बालेवाडी येथील मैदानावर नुकत्याच झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये १६ वर्षाखालील १०० मीटर व २०० मीटर रनिंग स्पर्धेेत ठाण्यातील मावळी मंडळ संस्थेचा अॅरोन अमित फिलीप याने सुवर्ण पदकाची कमाई केली. १०० मीटर रनिंग ११.२९ सेकंद तर २०० मीटर रनिंग २२.६३ सेकंदात पूर्ण करत यश मिळविले. मात्र १०० मीटरचा रेकॉर्ड ०.४ शतांश सेकंदाने हुकला. त्याच्या यशाबद्दल श्री मावळी मंडळ संस्थेचे अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक आणि संस्था व्यवस्थापनाकडून त्याचे कौतूक होत आहे. तसेच अॅरोनची आगामी एसजीएफआय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ठाण्यातील मावळी मंडळ स्कुल ही खेळासाठी विशेष महत्व जपणारी शैक्षणिक संस्था आहे. फुटबॉल, कबड्डी, खो-खोसह जिम्नॅस्टिक आणि अॅथलेटिक्स खेळासाठी शाळेतील प्रशिक्षण मिलिंद यादव, मिलिंद कदम, दर्शन देवरुखकर, प्रथमेश तांडेल, प्रणय कामले, नाईक व बाबू आदी प्रशिक्षक मुलांच्या खेळासाठी विशेष मेहनत घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष कृष्णा डोंगरे यावर विशेष लक्ष देत आहेत. पुण्यात पार पडलेल्या सीआयएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अॅरोन फिलीप मिळवलेले दोन सुवर्ण शमावळी मंडळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी उत्कृष्ट कामगिरी आहे. अॅरोनने लहानपणापासूनच अॅथलेटिक्सच्या अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. अॅरोनसह अनेक विद्यार्थी वरील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धामध्ये यश संपादन करीत आहेत.
27,766 total views, 1 views today