क्लबच्या साठ वर्षातील संस्मरणीय क्षणांच्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे ८८ वर्षीय जेष्ठ क्रिकेटपटू मदन नाखवा यांच्या हस्ते करणार
ठाणे : टेनिस बॉल क्रिकेटपासून सुरुवात करणाऱ्या आणि पुढे सिझन बॉल क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या फ्रेंडशिप क्रिके क्लबच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी हीरक महोत्सवी मित्र मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती क्लबचे सहकार्यवाह आणि जेष्ठ गुणलेखक बळवंत सकपाळ यांनी दिली.
चेंदणी कोळीवाड्यातील कुंभारवाडा (कोनबाळा ) मैदानावर टेनिसबॉल क्रिकेटप्रेमी युवकांनी एकत्र येत १९६० साली फ्रेंडशिप क्रिकेट क्लबची स्थापना केली. ठाण्यात आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर होणाऱ्या अनेक क्रिकेट स्पर्धातून क्लबने स्पृहणीय यश संपादन केले. १९७२ साली सिझन बॉल क्रिकेटला सुरुवात केल्यावर १९७६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित २२ व्या बाळकृष्ण बापट ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेत क्लबने उपविजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय ठाण्यात सपोर्टींग क्लब कमिटीतर्फे खेळवण्यात येणाऱ्या शामराव ठोसर ढाल क्रिकेट स्पर्धा, श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेत क्लबने आपली चांगली छाप पडली होती. पण नंतरच्या काळात कोनबाळा मैदानावर ठाणे महापालीकेच्या हरिचंद्र राऊत शाळा क्रमांक ९ आणि क्रमांक २७ ची उभारणी झाल्यावर क्रिकेट बंद पडले. त्यानंतर अकरा वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्याचा उपक्रम क्लबने सुरु केला.
करोनानंतर आता क्लबचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना क्लबचे संस्थापक क्रिकेटपटू मोहंन नाखवा (सौ भारती), कमलाकर कोळी (सौ प्रगती) , जगदीश कोळी (सौ रेखा ) आणि सुरेश ठाणेकर (सौ सस्मिता) यांनी वैवाहिक जीवनाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय क्लबच्या या साठ वर्षातील संस्मरणीय क्षणांच्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे ८८ वर्षीय जेष्ठ क्रिकेटपटू मदन नाखवा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा यांनी सांगितले.
24,067 total views, 1 views today