वीज मिळाली, पाणी मिळाले, वस्तीला नवी ओळख मिळाली

आमदार संजय केळकर यांच्या सहवासात कष्टकरी वस्तीने साजरी केली दिवाळी

ठाणे : ठाणे आणि मुंबईच्या वादात अडकलेल्या कष्टकरी समाजाच्या लोकांच्या वस्तीत आमदार संजय केळकर यांनी वीज आणली. आता या वस्तीला पाण्याची जोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने येथील रहिवाशांची दिवाळी गोड झाली आहे. आपल्या मतदारसंघात ही वस्ती नसतानाही केळकर यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एका वंचित वसाहतीला ओळख मिळवून दिल्याने कौतुक होत आहे.
ठाण्यातील कशिश पार्क येथील जुना तबेला येथे २५ कुटुंबे गेल्या ३५ वर्षांपासून रहात आहेत. ही वस्ती मुंबईच्या हद्दीतील आहे कि ठाण्याच्या हद्दीतील आहे याचा वाद सुरु असल्याने ही कुटुंबे मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होती. काहीही पुरावे नसल्याने त्यांना वीज जोडणीही मिळत नव्हती. येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. केळकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. मतदार संघात ही कुटुंबे येत नसल्याने आमदार निधी वापरता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला. जिल्हा प्रशासनाने महावितरणकडे आवश्यक तो निधी वर्ग केला आणि केबल, वीज मीटरचा प्रश्न मार्गी लागला.
चार वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या वस्तीत प्रत्येक घरात विजेचा दिवा पेटला आणि वस्तीतील लोकांनी आ. केळकर यांच्यासह खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. आमदार केळकर यांच्या हस्ते मीटर बॉक्सचे अनावरण झाले. वीज बिल मिळू लागल्याने या कुटुंबांना आधार कार्ड, पॅन कार्डही तयार करता आले. शासकीय योजनांचा लाभ मिळू लागला.
चार वर्षांनंतर पुन्हा या वस्तीची दिवाळी गोड होत आहे. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने या वस्तीला नवीन पाण्याची जोडणी मिळाली असून त्यांच्या हस्ते याचे आज मंगळवार, २५ ऑक्टोबर रोजी उदघाटन करण्यात आले. यावेळी मृणाल पेंडसे, राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाचे प्रशांत जाधव, वार्ड अध्यक्ष सोनी चव्हाण, पूजा गंद्रे, जय कोकणे, किरण धत्तुरे आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केळकर यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
ठाणे आणि मुंबईच्या वादात अडकलेल्या कष्टकरी समाजाच्या लोकांच्या वस्तीत आमदार संजय केळकर यांनी वीज आणली. आता या वस्तीला पाण्याची जोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने येथील रहिवाशांची दिवाळी गोड झाली आहे. आपल्या मतदारसंघात ही वस्ती नसतानाही केळकर यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एका वंचित वसाहतीला ओळख मिळवून दिल्याने कौतुक होत आहे.
ठाण्यातील कशिश पार्क येथील जुना तबेला येथे २५ कुटुंबे गेल्या ३५ वर्षांपासून रहात आहेत. ही वस्ती मुंबईच्या हद्दीतील आहे कि ठाण्याच्या हद्दीतील आहे याचा वाद सुरु असल्याने ही कुटुंबे मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होती. काहीही पुरावे नसल्याने त्यांना वीज जोडणीही मिळत नव्हती. येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. केळकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. मतदार संघात ही कुटुंबे येत नसल्याने आमदार निधी वापरता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला. जिल्हा प्रशासनाने महावितरणकडे आवश्यक तो निधी वर्ग केला आणि केबल, वीज मीटरचा प्रश्न मार्गी लागला.
चार वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या वस्तीत प्रत्येक घरात विजेचा दिवा पेटला आणि वस्तीतील लोकांनी आ. केळकर यांच्यासह खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. केळकर यांच्या हस्ते मीटर बॉक्सचे अनावरण झाले. वीज बिल मिळू लागल्याने या कुटुंबांना आधार कार्ड, पॅन कार्डही तयार करता आले. शासकीय योजनांचा लाभ मिळू लागला.
चार वर्षांनंतर पुन्हा या वस्तीची दिवाळी गोड होत आहे. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने या वस्तीला नवीन पाण्याची जोडणी मिळाली असून त्यांच्या हस्ते याचे आज मंगळवार, २५ ऑक्टोबर रोजी उदघाटन करण्यात आले. यावेळी मृणाल पेंडसे, राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाचे प्रशांत जाधव, वार्ड अध्यक्ष सोनी चव्हाण, पूजा गंद्रे, जय कोकणे, किरण धत्तुरे, प्रमोद चव्हाण आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.केळकर यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
ठाणे आणि मुंबईच्या वादात अडकलेल्या या वस्तीला मतदार संघाबाहेर जाऊन माणुसकीच्या धाग्याने जोडत केळकर यांनी नवीन ओळख दिल्याने येथील रहिवासी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

 69,004 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.