वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आयोजित ही स्पर्धा २९ व ३० ऑक्टोबर रोजी होणार
ठाणे : वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आयोजित प्रांत स्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धा २९ ते ३० ऑक्टोबर रोजी होत आहेत. या स्पर्धा सावित्रीबाई थीराणी विद्यामंदिर, वर्तक नगर येथे होतील.
वनवासी कल्याण आश्रम ही अखिल भारतीय संस्था गेली ६९ वर्ष वनवासी बांधवांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी, जनजातीच्या प्रगतीसाठी काम करीत आहे. याच ध्येयाने वनवासी कल्याण आश्रम, जनजाती बाधवांच्या क्रिडा नैपुण्याला वाव मिळावा, जनजाती मूलांना आपले खेळातील प्राविण्य सिध्द करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने संपूर्ण भारत भर जनजाती मुलांसाठी खेलकूद स्पर्धांचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील अशा खेलकूद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीची कोकण प्रांत स्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा ठाण्यातील थिराणी शाळेत आयोजित करण्यात आली आहे. कोकण प्रांतातील ठाणे, पालघर, शहापूर, रायगड, कुलाबा अशा ५ जिल्ह्यातील जनजाती मुलांच्या तालुकाशः, जिल्हाशः स्पर्धा यामधून विजयी झालेले एकूण १७५ खेळाडू या प्रांत स्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रांत स्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना वाराणसी, उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर, तिरंदाजी प्रशिक्षक पंकज आठवले आणि बक्षीस समारंभ साठी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत यांना आमंत्रित केले आहे.
28,335 total views, 1 views today