एंजल वनची ‘शगुन के शेअर्स’ मोहिम

शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते.”

मुंबई : दिवाळीचा उत्साह साजरा करत एंजल वन पुन्हा ‘शगुन के शेअर्स’ मोहिम घेऊन आली आहे. यंदा फिनटेक कंपनी लोकांना दिवाळी प्रथा म्हणून मुहूर्त ट्रेडिंगचा अवलंब करण्यास आणि एंजल वनसह त्यांच्या स्मार्ट गुंतवणूकांच्या प्रवासाला सुरूवात करण्यास प्रेरित करत आहे.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘’दीर्घकाळापासून फक्त गुंतवणूकदार व व्यापारी मुहूर्त ट्रेडिंगला फॉलो करत आहेत. शेअर मार्केटमध्ये लोकांचा वाढता सहभाग पाहता मुहूर्त ट्रेडिंग ही अधिकाधिक लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यासाठी दिवाळीच्या इतर सादरीकरणांप्रमाणेच एक चांगली सुरुवात होऊ शकते. यंदाच्या आमच्या शगुन के शेअर मोहिमेद्वारे आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते.”
एंजल वन लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, ‘’भारत विविध परंपरेने नटलेला देश आहे. शेअर मार्केटमध्ये देखील परंपरा आहे, जी आमच्यासाठी अद्वितीय आहे, ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग. मुहूर्त तास आर्थिक वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक आहे आणि आमचे अत्याधुनिक स्मार्ट सोल्यूशन्स लोकांना या शुभ प्रसंगी त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरू करण्यास सक्षम करू शकतात. आम्ही अधिकाधिक लोकांना यंदा मुहूर्त ट्रेडिंग तासादरम्यान गुंतवणूक करण्यास प्रेरित करण्यासाठी उत्सुक आहोत.’’
या मोहिमेचा भाग म्हणून एंजल वनने डिजिटल जाहिरात रीलीज केली आहे, ज्यामध्ये एक तरूण दिवाळीला मुहूर्त अवरदरम्यान गुंतवणूक करतो आणि लोकांना त्वरित खाते उघडणे, शून्य ब्रोकरेज व स्मार्ट शिफारशींसाठी एंजल वनसह स्मार्ट गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो. कंपनीने विविध शैलींमधील प्रभावकांसोबत सहयोग देखील केला आहे आणि फायनान्सबाबत चर्चेला सुरूवात करण्यासाठी आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप स्पर्धेचा लाभ घेत आहे. एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ मेसेजमध्ये मुहूर्त ट्रेडिंगबाबत सांगितले आहे.

 180 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.