कळवा मुंब्रा दिवा, भिवंडी मधील टोरंटला स्थगिती द्या-काँग्रेसची मागणी

     

ठाणे;एम्.एस्.इ.बी चे खाजगीकरण करून कळवा-मुंब्रा-दिवा व भिवंडी मध्ये राबविण्यात येत असलेल्या टोरंट ला त्वरीत स्थगिती द्या अशी मागणी शहर काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली.

           ठाणे : ठाणे शहर काॅग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली याप्रसंगी काॅग्रेस शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण,काॅग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,महिला अध्यक्षा वैशाली भोसले,कळवा ब्लाॅक अध्यक्ष राजू शेट्टी,मुंब्रा ब्लाॅक अध्यक्ष निलेश पाटील,शहर काँग्रेसचे रेखा मिरजकर, स्वप्नील कोळी,नितीन घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,संपूर्ण महाराष्ट्रात आज ठाणे हे केंद्रस्थानी असून मधल्या काळात ठाण्यातीलच मुख्यमंत्री असलेले मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णयाना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला आहे टोरंटची अंमलबजावणी पासूनच या विरोधात जनतेमध्ये रोश व्यक्त होत होता,याच मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांनीही याचा विरोध केला होता म्हणूनच जनतेला टोरंट बाबत मुख्यमंत्री चांगला निर्णय घेतील असा विश्वास वाटत होता परंतु  ठाण्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून आता पुन्हा काॅग्रेस पक्षांकडून आम्ही मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे टोरंट ला त्वरीत स्थगिती द्यावी व कळवा,मुंब्रा,भिवंडी मधील नागरिकांना दिलासा द्यावा.

एम्.एच.04 ला टोलमुक्त करा
ज्यावेळेस काॅग्रेस आघाडीचे सरकार होते त्याच वेळेस आमदार असलेले व सध्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांनी एम्.एच.04 गाड्यांना टोलाही द्याव्या याकरिता रास्ता रोको आंदोलन केले होते आता तर स्वतः मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे म्हणून ठाण्यातील एमएच 04 ला टोलाही द्यावी अशी मागणी शहर काॅग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

 142,102 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.