मुंबई व मुंबई उपनगरचा किशोर-किशोरी खो-खो संघ जाहीर

विघ्नेश कोरे व सृष्टी पाष्टे मुंबईचे तर साहिल वासनिक व आर्या भाटकर उपनगरचे कर्णधार

मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याचे किशोर-किशोरी संघ जाहीर करण्यात आले ते खलील प्रमाणे.
मुंबई किशोर गट : कर्णधार – विघ्नेश कोरे, लविन बोथ (सर्व अमरहिंद मंडळ), उपकर्णधार – निहाल पंडित, राहुल नेवरेकर (सर्व वैभव स्पो. क्लब), कार्तिक जोंधळे, प्रशिक मोरे, हिदान पेडणेकर (सर्व युवक क्री. मंडळ), सार्थक माडये, आर्यन जाधव, सुजल शिंत्रे (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), ओमकार जाधव, अनोष कदम, क्रिश गजमल (सर्व विद्यार्थी क्री. केंद्र), साई गुरव (ओम समर्थ भा. व्या. मंदिर), साईश शिंदे (श्री समर्थ व्या. मंदिर), प्रशिक्षक – तुषार चिखले व व्यवस्थापक – संदीप केदार
मुंबई किशोरी गट : कर्णधार – सृष्टी पाष्टे, अवनी पाटील (सर्व ओम समर्थ भा. व्या. मंदिर), उपकर्णधार – निर्मिती परब, कादंबरी तेरवणकर, आर्या जाधव, सिया तोडणकर (ओम साईश्वर सेवा मंडळ), मुस्कान शेख, शर्वी नडे, सिध्दी शिंदे, अनुष्का गौड (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), हर्षला सकपाळ, रिया सिंह (सरस्वती कन्या शाळा), पूर्वा महाडिक (वैभव स्पो. क्लब), अस्मि टेमकर (श्री समर्थ व्या. मंदिर), प्रांजल पाताडे (अमरहिंद मंडळ), प्रशिक्षक – डलेश देसाई व व्यवस्थापिका – अक्षया गावडे
मुंबई उपनगर किशोर गट : निखील देवकर, साहिल वासनिक (कर्णधार), अर्जुन सहेजराव, अरमान अन्सारी, धम्मपाल लोखंडे (सर्व नंदादीप विद्यालय), अक्षय बोडके, अक्षय राठोड, अमेय मुर्चावडे (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), रामचंद्र ताटे (रामचंद्र म. न. पा. शाळा), कृष्णा हरिजन (आय. बी. पटेल म. न. पा. शाळा), आदेश राठोड (ओम युवा क्री. मंडळ), सचिन साहणी (सिध्दार्थ नगर म. न. पा. शाळा), तेजस पवार (प्रबोधिनी इ. स्कूल), धिरज डोंबले (नवशक्ती क्रीडा मंडळ), सौरभ मयेकर (प्रशिक्षक), प्रदीप विचारे (व्यवस्थापक)
मुंबई उपनगर किशोरी गट : मुग्धा बागकार, आर्या भाटकर (कर्णधार), गायत्री नाडकर्णी, वेदांतिका पाटील, मुक्ता थेरडे (सर्व सह्याद्रि विद्या मंदिर), लक्ष्मी धनगर, दिव्या चव्हाण, दिव्या गायकवाड (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), धानी रोलेकर (न्यू इ. स्कूल), समीक्षा गोडबोले, दीक्षा दांदेकर (सर्व समता विद्या मंदिर), सृष्टी जाधव, मनाली ग. (प्रबोधिनी इ. स्कूल), श्रद्धा कांबळे (नवशक्ती क्रीडा मंडळ), श्रेया टिबरेवाल (गोकुलधम हायस्कूल), मंदार चव्हाण (प्रशिक्षक), हर्षा सडेकर- इंगळे (व्यवस्थापिका)

 352 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.