पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
ठाणे : सी. के. पी. सोशल क्लबच्यावतीने कृष्णकांत टिपणीस यांच्या स्मरणार्थ २ ऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान सी. के. पी. हॉल, खारकर आळी, ठाणे, पश्चिम येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे संलग्न जिल्ह्यांमार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे carrom.mca1954@gmail.com या ई-मेलवर १९ ऑक्टोबरपर्यंत नोंदवावीत. मुंबईतील खेळाडूंनी आपली नावे संलग्न क्लबमार्फत १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान बी- जी / ४, बाळ गोविंददास मार्ग, टायकलवाडीसमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई -४०० ०१६ येथे नोंदवावीत.
26,213 total views, 1 views today