कोपरी `आयटीआय’च्या
नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर

आमदार निरंजन डावखरे यांना राज्य सरकारकडून माहिती

ठाणे : कोपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (मुलींचे आयटीआय) इमारतीच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती राज्य सरकारचे रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आमदार निरंजन डावखरे यांना पत्राद्वारे कळविली आहे.
मुलींच्या आयटीआय इमारतीची दुरवस्था झाल्याबरोबरच, इमारतीत अनेक गैरसोयी असल्यामुळे गैरसोय होत असल्याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे विशेष उल्लेख सुचनेद्वारे लक्ष वेधले होते. तसेच लवकरात लवकर नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.
`आयटीआय’ इमारतीच्या कामासाठी २ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपये खर्चाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीनेही निधीसाठी तरतूद केली आहे. त्यानंतर या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

 4,063 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.