व्हिस्टाडोम कोचचे  प्रवाशांना वाढते आकर्षण



यावर्षी एप्रिल  ते सप्टेंबर या ६ महिन्यांत सुमारे ५६ हजार प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला *एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ७.३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

मुंबई : मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.  मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे हिट ठरले आहेत.
मध्य रेल्वेने यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर  या सहा महिन्यांत ५६.८९५  प्रवाशांची नोंदणी करून  ७.३२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही १००% पेक्षा जास्त वहिवाट (occupancy) म्हणजे  १६.०७८ प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे असून  ३.३५ कोटी रुपये महसूल मिळविला आहे.  मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीनने अप दिशेने पुणे ते मुंबई दरम्यान १.४३ कोटीं रुपयाच्या महसूलासह ९९% वहिवाट (occupancy) नोंदवली आहे. मुंबई- पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ने १००% वहिवाट (occupancy) सह म्हणजेच १६.१९० प्रवासीसंख्या  आणि १.२६ कोटीरुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
वर्ष २०१८ मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच सप्टेंबरपासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.
या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये गतवर्षीच्या जून महिन्यापासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला १५ ऑगस्टपासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये जुलैपासून जोडण्यात आले. तसेच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच ऑगस्टपासून जोडण्यात आला आहे.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.  

 183 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.