‘वाघर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटात वास्तविकतेचे दर्शन घडवले आहे, चित्रपटाची कथा इमोशनल असून कुठे वळण घेणार हे ट्रेलरमधून स्पष्ट होत नाही. मात्र, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

ठाणे : राजेंद्र बरकडे निर्मित व भिमराव पडळकर दिग्दर्शित छोट्या कळीच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारी ही एक आगळी वेगळी कथा असलेला वाघर हा चित्रपट शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
नुकताच या चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे, दिग्दर्शक भिमराव पडळकर, सिनेमॅटोग्राफर अमन खान व आदी उपस्थित होते. एक १२ वर्षांची ठकी नावाची छोटी मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी आहे, पण अचानक तिच्या लग्नाची तयारी चालू होते आणि तिच्या आनंदाला जणू काही नजरचं लागते. तिला इच्छा नसतानाही लग्न करण्याची वेळ येते व अनेक प्रसंगांना तोंड देताना यामध्ये दिसून येत आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट वास्तविकतेचे दर्शन घडवणारे वाटत आहे, चित्रपटाची कथा इमोशनल असून कुठे वळण घेणार हे ट्रेलरमधून स्पष्ट होत नाही. मात्र, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून रसिकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्माते राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटात समिक्षा सोनवलकर,मिलिंद शिंदे,संजय जाधव, प्रिया दुबे व सहकलाकारांनी यांच्यासह भूमिका निभावल्या असून राजेंद्र फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत वाघर चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले व दिग्दर्शन भिमराव पडळकर यांचे असून अनेक मराठी व हिंदी चित्रपटाचे छायाचित्रण करणारे सिनेमॅटोग्राफर अमन खान यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे.

 27,687 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.