कवयित्री शान्ताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेनिमित्त बुधवारी कवी प्रा. प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन*
ठाणे : कवयित्री शान्ताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीची सांगता बुधवारी होत आहे. त्यानिमित्त ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाकडून कवी प्रा. प्रवीण दवणे यांचे ‘कवितेतील शान्ताबाई’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री शान्ताबाई शेळके यांचे काव्यविश्व उलगडणारा हा कार्यक्रम बुधवारी, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथ नगर, ठाणे (प.) येथे संपन्न होणार आहे. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे उपस्थित राहणार आहेत. आपल्या साहित्यातून, कविता-गीतांमधून मराठीजनांना निर्मळ आनंद दिलेल्या शान्ताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीची सांगता त्यांच्या कवितेचा जागर करून व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. हर्षला लिखिते यांनी दिली.
10,759 total views, 1 views today