राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा पदकांचा पाऊस
मुंबई : नुकत्याच जयपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किकबाँक्सिंग स्पधैत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अक्षरशः पदकांचा पाऊस पाडला. मुंबईच्या आयुष सावंत, देवषी सिंघल, सिद्धी गुरव यांनी दमदार कामगिरी करत सोनेरी यश संपादले.
जयपूर मधील सवाई मानसिंग स्टेडियम (एस एम एस) येथे झालेल्या स्पर्धेत कॅडेट, ज्युनिअर आणि सिनियर गटातून खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने अफलातून खेळ करताना ११० सुवर्ण, ६८ रौप्य व ५३ कांस्य मिळून एकूण २३१ पदके मिळवित स्पर्धेत प़थम क़मांक पटकावला.
या स्पर्धेसाठी राज्याच्या संघात जोगेश्वरी येथील इंडो रिओ कराटे डू अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अनेक खेळाडू होते. त्यापैकी आयुष सावंत, देवषी सिंघल आणि सिध्दी गुरव यांनी धडाकेबाज कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना इंडो रिओ कराटे डू अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या कोच रंजन चौहान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
283 total views, 3 views today