कारवाईचे अधिकार विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना
ठाणे : स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावरील कचरा तसेच बायोमास जाळणे व बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांस देण्यात आले आहेत. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड आकरण्यात येणार असून असून सदरची कारवाई प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत करण्यात येणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यास २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभाग करेल तर, बांधकाम साहित्य कचऱ्याच्या विना आच्छादन वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण झाल्यास ५ हजार रुपये दंड, बांधकाम साहित्य कचरा वाहनाद्वारे/ रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, खाजगी जागेत अनधिकृतपणे टाकल्यामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणासाठी प्रति टन ५ हजार रुपये तर बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणासाठी २५ हजार रुपये दंड कर विभागाच्या वतीने आकारण्यात येणार आहे. ही कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
*धूळमुक्त ठाणे शहरासाठी.*
ठाणे शहर धूळ प्रदूषणापासून मुक्त रहावे यासाठी सर्व नागरिकांनी या नियमावलीचे पालन करावे व दंडात्मक कारवाई टाळावी. दंडात्मक कारवाईबाबत काटेकोर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– *मनिषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी, ठाणे महापालिका*
725 total views, 1 views today