स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे ठरलेलेल्या वेळेत पूर्ण करा

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आदेश, सीसीटीव्ही प्रकल्पाची अमलबजावणी पोलिसांना उपयोगी पडेल अशी करण्याच्या सूचना

ठाणे  : स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेले १५ प्रकल्प हे नियोजित वेळेत पूर्ण व्हायलाच हवेत. तसेच, त्यातील सीसीटीव्ही प्रकल्पाची अमलबजावणी करताना त्याचा पोलिसांना सर्वाधिक उपयोग होईल, याची दक्षता घ्या, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरूवारी दिले. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे १०५० कोटी रुपयांच्या कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला.
अतिरिक्त आयुक्त (१) आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सर्व प्रकल्पांची माहिती व सद्यस्थिती सांगणारे सादरीकरण केले. एकूण ३९ प्रकल्पांपैकी २४ पूर्ण झाले असून १५ प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अतिक्रमणे, वनखात्याचे आक्षेप, जनहित याचिका आदींमुळे प्रकल्पांच्या कार्यकाळात होत असलेल्या विलंबाबद्दलही माळवी यांनी आयुक्त बांगर यांना अवगत केले.
गटारांची कामे पावसाळ्यानंतर तीन महिन्यात पूर्ण करावीत. पुढील पावसाळ्यापर्यंत ही कामे रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या.
ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्पांची वाटचाल आणि गावदेवी मैदानाखालील भूमिगत पार्किंग कामांबाबत आयुक्त बांगर समाधान व्यक्त केले. मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या नवीन स्टेशनाचा विषयाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडलेले ४०० कॅमेरे आणि पालिकेच्या हाजुरी येथील सेंटरशी जोडलेले १७०० कॅमेरे यांचे एकत्रिकरण करावे. या दोन्ही यंत्रणांचा सर्वाधिक उपयोग पोलिसांना आहे. हे लक्षात घेऊन ही यंत्रणा प्राधान्याने जोडून घ्यावी. कामे करताना कोणत्याही समस्या आल्या असतील तर त्यावर मार्ग काढून हा प्रकल्प उपयोगी कसा होईल हे पहावे, अशी सूचना आयुक्तांनी संंबंधितांना केली.

 33,016 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.