ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमा

खासदार राजन विचारे यांची रेल्वे महाव्यवस्थांकडे मागणी
ठाणे :  नुकताच ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर एका महिलेला फेरीवाल्याकडून झालेल्या मारहाणी प्रकरणी तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्यामुळे त्या महिलेने जबाबदार फेरीवाल्याला दोषी ठरवून रेल्वे पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. या संदर्भात योग्य दोशीवर कडक कारवाई करण्याची मागणी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी व आर पी एफ चे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला तसेच लोहमार्ग पोलीस आयुक्त केसर खलीद यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे.
त्यामध्ये सदर ५२ वर्षाची महिला ही कोपरीतील रहिवासी दादर वरून आणि रेल्वे स्थानकात परतत असताना फलाट क्रमांक पाच वरून जुन्या रेल्वे पुलावर आल्यानंतर फलाट क्रमांक ७,८ वरील पुलावर एका फेरीवाल्याच्या बाकड्याला धक्का लागला सदर महिलेने त्या फेरीवाल्याला बाकडे बाजूला करण्यास सांगितले. त्यावेळी त्या फेरीवाल्यांनी त्या महिल्याची हुज्जत घालून शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. त्या महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. परंतु सदर आरोपीला पाठीशी घालण्याचा रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न केला जात होता. संबंधित बाळू डुकरे या गुन्हेगार प्रवृत्तीच्या फेरीवाल्यावर कडक कारवाईची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा ते आठ लाख प्रवास ये-जा करीत असतात एन गर्दीच्या वेळीच सदर फेरीवाले पादचारी पूल व स्थानक परिसरातील हद्दीत आपले बस्तान बांधून बसत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनास्थानका बाहेर पडण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. या संदर्भात वारंवार रेल्वेकडे तक्रारी करून सुद्धा रेल्वे पोलीस ठाणे महानगरपालिका हद्दीची कारण सांगून हात वर करीत असतात. यावर कठोर कारवाई करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महानगरपालिका व रेल्वे मधील यांची एक संयुक्त बैठक घेऊन यामध्ये एक जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी रेल्वेकडे व महानगरपालिकेकडे केली आहे. जेणेकरून यासंदर्भात फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक होण्यास मदत होईल व याची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकापासून करण्यात यावी हा प्रयोग इतर स्थानकातही करण्यात यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. खासदार राजन विचारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्याशी चर्चा करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास जन आंदोलन केले जाईल असा इशारा रेल्वे प्रशासनाला केला आहे.

 5,213 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.