बिकेसीमधील दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून रसद

दसरा मेळाव्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन लाखाहून अधिक लोकांची केली जेवणाची सोय

ठाणे : दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, आपल्या अनुयायांना आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या शेकडो बसेस राज्यभरातून मुंबईत येणार आहेत. मुंबईत येणाऱ्या या लाखो लोकांचा पोटोबा शांत करण्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलली आहे.त्यासाठी ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या ठिकाणी दोन लाखाहून अधिक लोकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. येणाऱ्या या कार्यकर्त्यांना आवडेल असा मेन्यू ठरवण्यात आला आहे. त्यात खास करून धपाटे ,चटणी, कचोरी आणि गोड पदार्थांचा समावेश आहे. मोठया संख्येने येणाऱ्या कार्यकर्त्यांकरता जेवण तयार करण्यासाठी जर्मनी ,जपान आणि भारतीय बनावटीच्या मशिनरीचा वापर होत आहे. तसेच या मेळाव्यात लाखो लोक येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सांगली ,सातारा, कोल्हापूर या ठिकाणीच्या महिला धपाटे बनवण्यासाठी बोलवल्या आहेत. हे जेवण कुठेही खराब होणार नाही याची दक्षता प्रशांत कॉर्नर या मराठी व्यावसायिकाने घेतली आहे .

 7,515 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.