नेटाफिम ठिबक सिंचनातून ऊस शेतीचा कायापालट

नेटाफिम इरिगेशन सबसरफेस ड्रीप आणि डबल ड्रीपलाईनचा वापर ऊस पिकामध्ये वाढण्यासाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन करीत आहे. त्याचप्रमाणे नेटाफिम इरिगेशनतर्फे  स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा (डीजीटल फार्मिंग सोलुशन) चा वापर मोठ्या ऊस क्षेत्रावर करण्यास शेतकऱ्याना प्रवृत्त करण्यात येत आहे.

मुंबई : भारतामध्ये नेटाफिम इरिगेशन (इंडिया) ही कंपनी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून आजतागायत २८ लाख एकरहून अधिक क्षेत्रावरील ठिबक संचधारक शेतकऱ्याना समाधानकारक सेवा देत आहे. आजपर्यंत नेटाफिम कंपनीकडून महाराष्ट्रातील ऊस क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर वाढण्यासाठी काही साखर कारखान्यांशी करारनामा करून, तसेच शेती व ऊस विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांना प्रशिक्षण देऊन एक लाख सत्तर हजार हेक्टरहून अधिक ऊस क्षेत्रावर नेटाफिम ठिबक संच यशस्वीपणे कार्यरत आहेत. पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होऊन शेतकऱ्यांच्या ऊसाचे उत्पादनात ३० ते ३५ % हमखास वाढ झालेली आहे. राज्यातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील असून अल्पभूधारक शेतकऱ्यास ८०% आणि इतर शेतकऱ्याना ७५% अनुदान देण्यात येत आहे. 
अरुण देशमुख, प्रमुख – कृषीविद्या विभाग, मध्य आणि उत्तर भारत, नेटाफिम इरिगेशन (इंडिया), म्हणाले, “जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी, पाणी व अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करून ऊस पिकाचे शाश्वत स्वरुपात दर एकरी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रात ऊस पिकात ठिबक सिंचनाचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ मिळाल्याने आजतगायत राज्यामध्ये जवळपास ३.५ लाख हेक्टर ऊस  क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे. दरवर्षी साधारणपणे २० ते २५,००० हेक्टर ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येत असते. ठिबक सिंचनाखाली येणारे ऊस क्षेत्र हे प्रामुख्याने भूगर्भातील पाण्यावर सिंचित होणारे असते. परंतु उसासारख्या दीर्घायुषी व जास्त पाण्याची आवश्यकता असणारया पिकामध्ये इथून पुढे भूगर्भातील सिंचनासह, कॅनाल व उपसा सिंचनाखालील ऊस क्षेत्रही ठिबक सिंचनावर मोठ्या  प्रमाणवर आणणे अत्यंत जरुरीचे आहे.” 
ऊस हे महाराष्ट्राचे महत्वाचे नगदी आणि औद्योगिक पिक असून या पिकाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. एकूण २३० लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी साधारणपणे १३ ते १४ लाख हे. क्षेत्रावर ऊस पिक घेतले जाते. ऊस लागण हंगामानुसार उसास प्रचलित सरी – वरंबा पद्धतीने २५० ते ३२५ हे. से. मी. पाणी दिले जाते. खासकरून कॅनाल व उपसा सिंचन कार्यक्षेत्रात आजही शेतकरी उसाची पाण्याची गरज लक्षात न घेता ‘ जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन’ या चुकीच्या संकल्पनेने उस लागणीपासून उस तुटेपर्यंत जास्तीत जास्त पाणी  पाटपाण्याने देण्याचा  प्रयत्न करीत असतात. पाण्याच्या अति वापरामुळे जमिनी समस्यायुक्त म्हणजेच खारवट ,खारवट – चोपण  आणि चोपण  होऊ लागल्या आहेत. जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता झपाट्याने कमी होऊ लागली आहे, त्यामुळे ऊसाचे सरासरी उत्पादन एकरी फक्त ३५ ते ४० टन मिळत आहे. राज्यातील १३.६९ लाख हेक्टर ऊस क्षेत्रातून २०२१-२२ गळीत हंगामामध्ये २०० साखर कारखान्यांनी १३२० लाख टन उसाचे गळीत करून १३७.३० लाख टन साखर निर्माण केली. येणाऱ्या २०२२-२३ गळीत हंगामासाठी सुद्धा १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक उभे आहे. 
ठिबक सिंचन वापरल्याने उस पिकास आवशकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यामुळे भूगार्भागातील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होउन प्रवाही सिंचन पद्धतीशी तुलना करता ठिबक सिंचनामुळे ५० ते ५५% पाण्याची बचत होत आहे, आणि त्यामुळे उपलब्ध पाण्यात ठीबकद्वारे दुप्पट क्षेत्र सिंचित करता येत आहे. उसाच्या  मुळाच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पिक वाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने उस उत्पादन ३० ते ३५ % ने हमखास वाढत आहे. तसेच द्रवरूप अथवा पाण्यात विरघळनारी खते ठिबक सिंचनातून दिली गेल्याने खतांच्या मात्रेत ३० % पर्यंत बचत होत आहे. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशकांचा / खुरपणीचा खर्च कमी येत आहे. एकूणच ऊस उत्पादन खर्चामध्ये २० % बचत होत आहे.
राज्यातील हजारो शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून उसाचे दर एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. नेटाफिम ठिबक सिंचनाचा वापर करून कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशांत लटपटे, मु. पोस्ट: सावळवाडी, तालुका: मिरज, जिल्हा: सांगली या शेतकऱ्याने सव्वा पाच फुटावर १६ मिमी., ०.४० से.मी. अंतरावर २ लिटर / तास प्रवाह असणारी डबल ड्रीपलाईन वापरून दर एकरी १६७ टन उत्पादन घेऊन राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. याबद्दल त्यांचा कारखान्यातर्फे तसेच राज्याचे तत्कालीन साखर आयुक्त यांचाकडून सत्कारही झाला आहे. तसेच संजय कदम, मु. पोस्ट: खेराड वांगी, तालुका: कडेगाव, जिल्हा: सांगली या शेतकऱ्याने ६ फुट अंतरावर पृष्ट्भागाखालील(सबसरफेस ड्रीप) दाब नियंत्रित १६ मिमी ड्रीपलाईन वर ४० से. मी. वर २ लिटर चा ड्रीपर वापरून दर एकरी १३४ टन उत्पादन घेतले आहे. याच शेतकऱ्याने ६ फुट अंतरावर दाब नियंत्रित १६ मिमी, ४० से. मी. वर २ लिटर प्रवाहाची ड्रीपलाईन वापरून एकरी १३६.५ टनाचे उत्पादन घेतले आहे.
उसामध्ये सबसरफेस ड्रीप पद्धतीचा वापर केल्याने पाणी आणि खतांचा अधिक कार्यक्षम वापर होत असून ऊस यांत्रीकीकरण करणे सुलभ जात असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनात येत आहे. तसेच डबल ड्रीपलाईनचा वापर केल्याने ऊस ओळींच्या दोन्ही बाजूस पाणी आणि खतांचे समप्रमाणात वितरण होऊन उसाची वाढ जोमदार होत असून उत्पादनात भरीव वाढ होत असल्याने प्रगतशील शेतकरी त्याचा अवलंब करीत आहेत. नेटाफिम इरिगेशन सबसरफेस ड्रीप आणि डबल ड्रीपलाईनचा वापर ऊस पिकामध्ये वाढण्यासाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन करीत आहे. त्याचप्रमाणे नेटाफिम इरिगेशनतर्फे  स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा (डीजीटल फार्मिंग सोलुशन) चा वापर मोठ्या ऊस क्षेत्रावर करण्यास शेतकऱ्याना प्रवृत्त करण्यात येत आहे. राज्यात ३०० हून अधिक स्वयंचलित ठिबकची युनिटस ऊस पिकामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. ऊस पिकात ठिबक सिंचन वापर वाढविण्यासाठी दरवर्षी शेतकरी मेळावे, प्रशिक्षण वर्ग, फिल्ड डे, शेतकरी सहलि  यांचे आयोजन नेटाफिम मार्फत केले जाते.
महाराष्ट्र राज्यातील मर्यादित सिंचन क्षेत्र, गुंतवणुकीवर निश्चित मोबदला मिळवून देणारे नगदी व औद्योगिक पिक म्हणून आणि खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध असल्याने वाढत जाणारे उसाखालील क्षेत्र, २०० हून अधिक साखर कारखान्यांना उसाची असणारी गरज, आणि ऊस शेतीमध्ये तसेच कारखानदारीमध्ये असणारया मनुष्यबळाचे महत्वाचे उपजीविकेचे साधन लक्षात घेता उसाखालील क्षेत्र मर्यादित ठेऊन दर एकरी ऊस उत्पादकता वाढविन्याशिवाय पर्याय नाही.
एकंदरीत ऊस शेतीमध्ये संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर केल्यास महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सिंचनाखालचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. ऊस तसेच इतर बागायती पिके, अन्नधान्य पिके,फळझाडे व भाजीपाला यांचा पिक आराखडा तयार करून ठिबक सिंचनाचा अवलंब करून पिकाखालील क्षेत्र न वाढवता शेतकऱ्यांचे दर एकरी उत्पादन, उत्पन्न  आणि निव्वळ नफ्यामध्ये निश्चितपणे वाढ करता येईल.  आणि यासाठी ठिबक सिंचन ही काळाची गरज ओळखून नेटाफिम इरिगेशन शासनाच्या सहकार्याने सदोदित प्रयत्नशील आहे. 

 201 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.