डॉ. अविनाश ढाकणे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आणि जास्तीत जास्त चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण इथे होण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा निर्मिती संस्थांना उपलब्ध करून देणार
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.अविनाश ढाकणे यांची नियुक्ती झाली असून, ३ ऑक्टोबर रोजी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या अधिकारी – कर्मचारी वर्गाने त्यांचे स्वागत केले.
प्रशासनाचा गाढा अभ्यास असणारे डॉ. ढाकणे हे यापूर्वी राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. मुळचे  अहमदनगर जिल्हातील पाथर्डीचे ते रहिवासी आहेत. १९९४ साली पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उप जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनात प्रवेश केला. पर्यवेक्षाधिन कालावधीत मालेगाव आणि नगर येथे उप विभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर तत्कालीन केंद्रीय वित्त राज्य मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी, तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे उप सचिव, तत्कालीन शिक्षण आणि ऊर्जा मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, एम.आय.डी.सीच्या कोकण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त, जळगाव जिल्हाचे जिल्हाधिकारी आदि महत्वाच्या पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. राज्याचे परिवहन आयुक्त असताना परिवहन विभागातील अनेक  धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले.
दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आणि जास्तीत जास्त चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण इथे होण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा निर्मिती संस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. 

 82,808 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.