‘ तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे’


ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांचे प्रतिपादन.

पुण्याचा पराग बदिरके ठरला ५४व्या पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचा विजेता, कनिष्ठ गटात मुंबईच्या सिध्दी मयेकर हिची बाजी

ठाणे : कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले. ५४व्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे होते. या वर्षीच्या स्पर्धेचे विजेतेपद पराग राजेंद्र बदिरके (यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे) याने पटकावले. तर, कनिष्ठ गटात  मुंबईतील रुईया महाविद्यालयाच्या सिध्दी मयेकर हिने बाजी मारली.
वाचन, चिंतन, मनन, स्मरण आणि विश्लेषण या पाच सूत्रांचा वापर वक्त्यांनी करावा. त्यातून त्यांना वक्तृत्व ही पदवी मिळवणे हे साध्य होईल, शिवाय, संवाद ही पीएचडी मिळवणे शक्य होईल, असेही लाटकर यांनी स्पष्ट केले. व्यक्तिमत्व विकासापासून ते वक्तृत्वाचा व्यावसायिक वापर या सर्व पैलूंबाबत लाटकर यांनी मार्गदर्शन केल.
ठाण्यातील  समर्थ सेवक मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कनिष्ठ आणि पदवी गटात मिळून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ठाणे, मुंबईसह चिपळूण, नाशिक, पुणे, उस्मानाबाद येथील स्पर्धकांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी ही स्पर्धा प्रत्यक्ष घेण्यात आली.
नियोजित व उत्स्फूर्त अशी दोन प्रकारची भाषणे करणाऱ्या स्पर्धकांचे परिक्षण डॉ. निलांबरी कुलकर्णी, डॉ. केतन भोसले, डॉ. मानसी केळकर आणि वरुण सुखराज यांनी केले. त्यांचा परिचय समिती सदस्य डॉ. राजश्री जोशी यांनी करून दिला. तर, त्यांचा सत्कार मंडळाचे विश्वस्त निशिकांत साठे आणि सरचिटणीस सविता कळके यांनी केला. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष संजीव हजारे यांनी केले. तर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष व स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी केले. लाटकर यांचे स्वागत कायर्कारी विश्वस्त उल्हास प्रधान यांनी केले. पारितोषिकांची घोषणा समिती सदस्य पौर्णिमा जोशी व योगेश भालेराव यांनी केली.
स्पर्धेचा निकाल –
पदवी गट : प्रथम क्रमांक –  पराग राजेंद्र बदिरके, यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
द्वितीय क्रमांक – वृषभ चौधरी, इग्नू, नाशिक
तृतीय क्रमांक – यश रवींद्र पाटील, बिर्ला महाविद्यालय, कल्याण
उत्तेजनार्थ– प्रतिक्षा परशूराम गायकवाड, कीर्ती महाविद्यालय, मुंबई
विशेष पारितोषिक
नियोजित– पराग राजेंद्र बदिरके, यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
उत्स्फूर्त – वृषभ चौधरी, इग्नू, नाशिक

कनिष्ठ गट
प्रथम क्रमांक –  सिध्दी नागेश मयेकर, रुईया महाविद्यालय, मुंबई
द्वितीय क्रमांक – आभा भोसले, रुईया महाविद्यालय, मुंबई
तृतीय क्रमांक– सृष्टी विक्रांत शिंदे, डी.बी.जे महाविद्यालय, चिपळूण
उत्तेजनार्थ – स्वरा दीपक पाटील, रुईया महाविद्यालय, मुंबई
विशेष पारितोषिक

नियोजित / उत्स्फूर्त – सिध्दी नागेश मयेकर, रुईया महाविद्यालय, मुंबई

 34,384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.