“असे होते आमचे दिघे साहेब”

खासदार राजन विचारे यांनी विभागीय मेळाव्यात शिवसैनिकांना सांगितली एकनिष्ठतेची  व्याख्या

ठाणे  : वर्तक नगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर,  रामचंद्र नगर, रघुनाथ नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, जीवन नगर हाजुरी, परिसरातील शिवसैनिकांचा विभागीय मेळावा वर्तकनगर येथे  झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन शिवसैनिकांना करण्यात आले. त्यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका समिधा मोहिते, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, लोकसभा सहसचिव विश्वास निकम, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, युवा सेना अधिकारी  किरण जाधव, शहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, बाळा राठीवडेकर, अशोक जाधव, राजू शिरोडकर, सचिन गोरविले, भालचंद्र देसाई, मोहम्मद, विनोद यादव व इतर शाखाप्रमुख, उप विभाग प्रमुख व समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी संपूर्ण हॉल तुडुंब शिवसैनिकांनी भरल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना एकनिष्ठतेची व्याख्या सांगत असताना ‘दिघे’ साहेबांच्या आठवणीतील किस्सा सांगितला.
त्यामध्ये त्यांनी ‘दिघे’ साहेबांना ज्यावेळी टाडा लावण्यात आला  त्यावेळी दिघे साहेबांनी “गद्दारांना क्षमा नाही” असे विधान केले होते. दिघे साहेबांना तुरुंगात असताना राजन विचारे हे नेहमी भेटण्यास जात होते. काँग्रेसचे नेते अॅड. प्रभाकर हेगडे यांनी राजन विचारे यांच्याकडे ‘दिघे’ साहेबांसाठी चिठ्ठी लिहून पाठविली होती. त्या चिठ्ठीत गद्दारांना क्षमा नाही ‘हे मी बोललो नाही असे स्टेटमेंट करण्यास सुचविले होते. परंतु दिघे साहेबांनी मी जे बोललो ते बोललो पण माघार घेणार नाही. असे बोलून चिठ्ठी  फाडली.  तुरुंगवास वाढला तरी चालेल परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. या विधानावर ठाम राहिले यावरून शिवसेना पक्षावर असलेली त्यांची एकनिष्ठतेची व्याख्या खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना  सांगितली. त्यांनी असेही सांगितले कि, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. परंतु दिघे साहेब सरकारच्या दडपशाहीला न जुमानता त्यांना शरण गेले नाहीत असा टोला त्यांनी मिंधे गटाला केला.
या विभागीय मेळाव्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने जुने जाणते नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

 17,263 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.