ठाण्यात रंगणार तृतीयपंथीयांची महाराष्ट्रातील पहिलीच मॅरेथॉन

एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी ‘एक मैल’ दौड , तृतीयपंथीयांसाठी विशेष मॅरेथॉन, १५० तृतीयपंथी सहभागी होणार

ठाणे :  ‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संकल्प केअर चे डॉ. पांडुरंग कदम, अक्षय शक्ती च्या संस्थापिका, उपाध्यक्ष मिनी सुबोथ, किन्नर अस्मिताच्या समाजसेविका सिमरन सिंग यावेळी उपस्थित होते. 
ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे ‘एक मैल’ अंतर्गत दौडचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी एक मैल दौड होणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  या दौड अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी ही विशेष मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून १५० तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर या स्पर्धे साठी अंकित स्पोर्ट्स, अमोल कॅटरेस, इंडियन कॉर्पोरेशन चे विशेष सहकार्य लाभले आहे.

 1,847 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.