ढोलकीपटू तेजस मोरेचा कोकणरत्न पुरस्काराने सन्मान

स्वामी विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेसिंग इन्स्टिट्युट एक्सल इंडस्ट्रिज लोटे आणि शाहीर रत्नाकर महाराज फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला गौरव

ठाणे ः स्वामी विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेसिंग इन्स्टिट्युट एक्सल इंडस्ट्रिज लोटे आणि शाहीर रत्नाकर महाराज फाउंडेशनच्यावतीने ठाण्यातील रहिवासी व सुधागड तालुक्यातील हातोंड गावचा सुप्रसिद्ध ढोलकीकींग तेजस पुंडलिक मोरे यास कोकण कलारत्न पुरस्काराने लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. परशुराम लोटे, रत्नागिरी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन जनरल सेक्रेटरी राज आंब्रे, कोकण दिंडीचे फड मालक ह.भ .रुपेश महाराज राजेशिर्के, व्हीं आर् टी.आय प्रकल्प सन्वयक विवेक शेंडे, मुख्य प्रवर्तक सुरेश पाटणकर, दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेजसच्या ढोलकीचा सोलो परफॉर्म व सौजसने सुमधूर गाणी गात रसिकांची मने जिंकली.

 129,815 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.