विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाही मराठमोळा पारंपरिक महाभोंडला

नवरात्रोत्सवाबरोबर सेवा पंधरवड्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम ठाणे

ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाही नवरात्रोत्सवात ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली श्री देवीची स्थापना केली जाणार असून, उमा निळकंठ व्यायामशाळेच्या प्रांगणात १ ऑक्टोबर रोजी मराठमोळा पारंपरिक महाभोंडला आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवडा अंतर्गत रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व भाजयुमोच्या कोकण सहसंयोजक वृषाली वाघुले यांनी दिली.
सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे शहरात विश्वास सामाजिक संस्थेतर्फे सलग २० व्या वर्षी उमा निळकंठ व्यायामशाळेच्या मैदानावर यंदाही १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाभोंडला आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे दरवर्षी होणारा महाभोंडला लक्षवेधी असून, त्यात लहान मुलींपासून वृद्ध महिलांचा सहभाग असतो.
नवरात्रोत्सवाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा, विश्वास सामाजिक संस्था आणि माजिवडा येथील डॉ. वावीकर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ पासून रिक्षाचालकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर भरविण्यात आले आहे. त्यात ५० रुपयांत चष्मा दिला जाणार आहे. तर दादा पाटीलवाडीत २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक वाटप केले जाईल. त्याचबरोबर वामनराव ओक रक्तपेढीच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनबाहेर २ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 21,645 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.