सणासुदीच्या हंगामात भारतीयांना पर्यटनाचे वेध

तिकीट भाडे वाढले तरी विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर

मुंबई : कोव्हिडमधील प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे, कारण पर्यटकांना पुन्हा एकदा नवीन पर्यटन स्थळे आणि नवीन अनुभव घेण्याची इच्छा आहे. हे कायक (KAYAK.co.in) या जगातील आघाडीवर असलेल्या पर्यटन सर्च इंजिनवर सुचवण्यात आले आहे, जे २०२२ मधील सणासुदीच्या हंगामातील पर्यटनाच्या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या विमानप्रवासाबद्दलच्या शोधांतून विश्लेषित करण्यात आले आहे.
हा डेटा असे दाखवतो की, भारतातील विमानतळांवरून विमानप्रवास केल्या जाण्याच्या प्रमाणात महामारीपूर्व काळाच्या तुलनेत ११८ टक्क्यांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाबद्दलचे शोध घेण्याचे प्रमाण हे साधारणपणे १४३ टक्क्यांनी वाढले आहे आणि स्थानिक विमानप्रवासांबद्दलचे शोध हे साधारणपणे ९१ टक्क्यांनी वाढले आहे. भारतीय पर्यटक देखील वाढलेल्या विमानभाड्यांमुळे अजिबात नाउमेद झालेले नाहीत हे प्रमाण २०१९ च्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाच्या बाबतीत ३८ टक्क्यांनी आणि देशांतर्गत विमानप्रवासाच्या बाबतीत ३९ टक्क्यांनी वाढलेले आहे. देशांतर्गत प्रवासाचे जाऊन-येऊन इकॉनॉमी विमानभाडे सणासुदीच्या हंगामामध्ये साधारणपणे रू. ८५८५ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे जाऊन-येऊन इकॉनॉमी विमानभाडे साधारणपणे ५६,३३२ आहे.
कायकवर केल्या गेलेल्या शोधानुसार, गमावलेल्या वेळेची भरपाई करून घेण्यासाठी भारतीय पर्यटक तयारी करत आहेत आणि महामारी काळाच्या आधीच्या तुलनेत ते पर्यटनासाठी अधिक उत्साही असल्याचे दिसत आहे. विमानप्रवास करण्यातील पर्यटकांचा उत्साह महामारीपूर्व काळाच्या तुलनेत वरचढ ठरत असतानाच आम्हाला हॉटेलांचा शोध घेतली जाण्याची पातळी देखील २०१९ च्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे.
कायकचे भारतातील राष्ट्रीय व्यवस्थापक, तरूण ताहिलिआनी म्हणाले की, “या उत्सवांच्या काळामध्ये छान डील्सचा आनंदही घेता येत आहे, सर्वाधिक स्वस्त तारखा जाणून घेण्यासाठी योग्य त्या फिल्टर्सचा वापर करा आणि तुमच्या प्राधान्याच्या स्थळांसाठी अ‍ॅलर्ट्स सेट करा.”

उत्सवातील सुट्ट्यांच्या कालावधीत कायकमधील सर्च इन्साइट्स:

● हॉटेलांचा शोध घेण्यात वाढ झाली: भारतीय पर्यटकांकडून हॉटेलांचा शोध घेण्यात २०१९ च्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि देशांतर्गत हॉटेलांचा शोध घेतल्या जाण्याच्या प्रमाणामध्ये साधारणपणे ९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
● हॉटेल भाड्यांच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली: एका रात्रीसाठी ३-४ तारांकित हॉटेलांतील डबल रूमच्या आंतरराष्ट्रीय किंमतींमध्ये भारतीय कायक युझर्ससाठी २०१९ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढ झाली आणि देशांतर्गत हॉटेल रूम्सच्या भाड्यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली.
● कमी दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सहली: या उत्सव काळामध्ये भारतीय पर्यटक अधिक प्रमाणात पर्यटन करणार असे शोधांमधून दिसत असले तरीही विमान भाड्यांच्या शोध डेटाच्या आधारावर सुट्ट्या घेण्याचा कालावधी २०१९ च्या तुलनेत कमी म्हणजे आंतरराष्ट्रीय सहलींचा २४ दिवस (२०१९ च्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी झाला आहे.
● दीर्घ कालावधीच्या देशांतर्गत सहली: विमान भाड्यांच्या शोध डेटाच्या आधारावर सहलीचा सरासरी कालावधी हा २०२२ मध्ये साधारणपणे ६ दिवसांचा आहे (२०१९ च्या तुलनेत एका दिवसाने वाढत आहे).

 14,501 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.