पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांनी केले आयोजन
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांनी दिवा रेल्वेस्टेशन येथे पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म नंबर एक व दोन वर रक्तदान शिबिराचे आयोजन केले महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ठाणे कार्यकारणी सदस्य अशोक पाटील, विजय भोईर, गणेश भगत दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ,सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, माजी मंडल अध्यक्ष सुधीर म्हात्रे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, सपना भगत,रेशमा पवार वॉर्ड अध्यक्ष नागेश पवार, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील,समशेर यादव ,राहुल शाहू, पंकज सिंग, अवधराज राजभर, सुशील सिंग, कल्पेश सारस्वत, प्रफुल साळवी, वीरेंद्र गुप्ता, अरविंद सिंग, निलेश भोईर, आशिष पाटील, प्रणव भोईर, गौरव पाटील, सुनील गोंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी दिवा रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .या रक्तदान शिबिरात प्रथम रक्तदान आरपीएफच्या जवान यांनी केले त्यांचे प्रशस्तीपत्रक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
10,717 total views, 1 views today