त्या अभियंते व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

दिवा आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात निरंजन डावखरे यांनी दिव्याचं भाजप शिष्टमंडळ घेऊन आयुक्तांना दिले निवेदन

दिवा : निकृष्ट काम व खड्ड्यामुळे अपघात होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने दिवा आगासन रस्त्याचा ठेकेदार व पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार आमदार निरंजन डावखरे यांनी दिव्याचे भाजप चे शिष्टमंडळ घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात भाजपने म्हटले आहे की,या रस्त्याचे मागील पाच वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथगतीने या रस्त्याचे काम सुरू असून ते नियमित होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काम या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी देखील वारंवार अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर गणेश नगर, बेडेकर नगर, आगासन पट्ट्यामध्ये या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट कामाचा फटका एका तरुणाला बसला असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गणेश उत्सवाच्या तोंडावर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.खड्ड्यामुळे सदर तरुणाचा हकनाक जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर, संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे,यावेळी कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर कार्यकारणी सदस्य अशोक पाटील सरचिटणीस समीर चव्हाण महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती पाटील भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, सपना भगत, वार्ड अध्यक्ष नागेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 190 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.