स्वच्छता हा शहराचा मानबिंदू , लोकसहभाग महत्वाचा : आयुक्त विजयकुमार म्हसाळ

भिवंडी दि. १७ : स्वच्छता हा शहराचा मानबिंदू असुन महानगर पालिकेचे कर्मचारी शहर स्वच्छते करिता आटोकाट प्रयत्न करित असले तरी प्रशासनाला याबाबत नागरिकांचे सहकार्य आवश्यक असुन लोकसहभाग हा स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचा घटक आहे आणि त्यादृष्टीने भिवंडीतील युवक, विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद नक्किच आश्वासक आहे , असे मत भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त विजयकुमार यांनी व्यक्त केले . केन्द्र शासनाने आयोजीत केलेल्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता सेवा दिनाच्या महानगरपालिका स्तरावरील कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .
केन्द्र शासनाने स्वच्छ भारत अभियान नागरी २ ची वर्षपूर्ती तसेच स्वच्छ भारत अभियान ला o८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत इंडीयन स्वच्छता लीग चे आयोजन केले असुन त्यामध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने भिवंडी ब्रिगेड या नावाने सहभाग घेतलेला आहे. या लीगच्या उपक्रमांतर्गत आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वराळदेवी तलाव येथील परिसर स्वच्छता व सुशोभीकरण कार्यक्रम आज राबविण्यात आला .
याप्रसंगी परिसर स्वच्छते सोबत वृक्षारोपण, टाकावू कचरा संकलन, टाकावू पासुन टिकाऊ निर्मिती, वराळ देवी तलावातील कचरा उपसा, इत्यादी उपक्रम शहरातील युवक, एनसीसी व एनएसएस, विद्यार्थी, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था, धार्मिक नेते, नागरिक तसेच महानगर पालिका कर्मचारी यांचे सहभागातून राबविण्यात आले,
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी यावेळी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा कमी करणे, कचऱ्याचे विलगीकरण करणे , कचऱ्याचा पुनर्वापर करणे याबाबत नागरिकांना आवाहन केले .
यावेळी उपस्थितांना स्वच्छता तसेच हरित पर्यावरण बाबत शपथ देण्यात आली .
याप्रसंगी महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, उपायुक्त दीपक झिन्जाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहायक आयुक्त प्रिती गाडे, डॉ.अनुराधा बाबर, प्रणाली घोन्गे, नितीन पाटील, सुनिल भोईर, बाळाराम जाधव, सोमनाथ सोष्टे, दिलीप खाने, फैजल तातली तसेच दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरु श्री . कुरेशी तसेच शहरातील बीएनएन महाविद्यालय, ओस्वाल महाविद्यालय, बाबा हायस्कूल, पवार हायस्कूल, पीईम हायस्कूल, जीएस मोमिन हायस्कूल चे प्राध्यापक व मुख्याध्यापक व विद्यार्थी, माजी सैनिक, भिवंडी वॉरीयर आणि इतर विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 714 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.