“स्वच्छ सागर..सुरक्षित सागर” मोहिमेस रायगडकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अलिबाग, दि. 17:- आपण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपला सागर किनाराही स्वच्छ ठेवण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन समस्त रायगडकरांनी आणि रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध सागर किनार्‍यांवर “स्वच्छ सागर सुरक्षित सागर” मोहीम उत्साहाने राबविली.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यातील मुरुड, काशिद, अलिबाग, आवास, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, आरावी या समुद्रकिनाऱ्यांवर आज एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात आला.
विविध सागरी किनाऱ्यावर आयोजित या उपक्रमाच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के- पाटील, स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अमित शेडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, राजेंद्र भालेराव, शुभांगी नाखले, पोलीस उप अधीक्षक जगदीश काकडे, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, तहसिलदार मीनल दळवी, सचिन गोसावी, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, रोहन शिंदे, विराज लबडे, मनोज उकिर्डे, पंकज भुसे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सीडीपीओ गीतांजली पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड, संबंधित गटविकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सागरी सीमा मंचचे रघुजीराजे‌ आंग्रे, वरसोली ग्रामपंचायत सरपंच प्रमिला भाटकर, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. राजाराम हुलवान, सुशील साईकर, रोटरी क्लब, लायन्स क्लब या व इतर स्वयंसेवी संस्था, दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर व इतर पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र शासनाचे पृथ्वी मंत्रालय व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. सागरी जीवन हा देखील मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून त्याची स्वच्छता राखणे, ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. या भावनेतूनच समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यासाठी स्थानिक जनतेने अभूतपूर्व सहकार्य केले.
जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील “स्वच्छ सागर सुरक्षित सागर” हे अभियान मुरुड, काशिद, अलिबाग, आवास, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, आरावी या समुद्रकिनाऱ्यांवर संपन्न झाले. सागरी किनाऱ्यावरील कचरा संकलनासाठी शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सागर किनाऱ्यांची स्वच्छता ही एक लोकचळवळ बनणार आहे. रायगडकरांचा या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जलचक्र पाहिल्यास जैविक सृष्टी 70 टक्के पाण्यात असून यात उत्पादक इकोसिस्टीमचाही समावेश आहे. सध्याच्या काळात वातावरण बदलाचा आपण अनुभव घेतोय. घराबरोबरच बाहेरील परिसर स्वच्छ न ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम सर्व जैविक सृष्टीला निश्चितच भोगावे लागतील. मानवनिर्मित कचऱ्यामुळे सूक्ष्म जीवापासून ते महाकाय जीवांनाही त्रास होत असल्याचे सिद्ध होत आहे. सागर परिसंस्थेतही मानव जातीकडून कळत-नकळत प्रदूषण केले जात आहे. त्याचबरोबर प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्यातील सूक्ष्म घटक निसर्गाला, मानवाला घातक आहेत. सर्वांनीच प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करण्याचा संकल्प करायला हवा. रासायनिक खतांचा वापरही टाळायला हवा, सर्वत्र स्वच्छता राखायला हवी, असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून सर्वाना करण्यात आले.

 200 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.