राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

मुंबई दि. १६ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय शरद पवारसाहेब तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड झाली आहे.

खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 311 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.