ठाणेः ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि मंगला हायस्कूलचे मुख्याध्यापक भुवनेंद्रसिंह बिस्ट अर्थात बिस्ट गुरुजींचे बुधवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गुरुवारी दुपारी जवाहरबाग वैकुंठभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी मराठी आणि हिंदी भाषिक समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. त्यांच्या पश्चात माजी नगरसेवक मुन्ना बिस्टसह ३ मुले, ३ मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तत्वचिंतक, कवी, गजलकार, लेखक, साहित्यिक अशा अनेक रुपात ओळख असलेले बिस्ट गुरुजींना मंगला हायस्कूलचे विद्यार्थी अन् पालकप्रिय मुख्याध्यापक म्हणून लोक गुरुजी या नावानेच ओळखत १९२७ साली उत्तराखंडातल्या गढवाली क्षेत्रात जन्म झालेले बिस्ट यांचा जीवनप्रवास फार वादळी आहे. मराठी, हिंदी साहित्य वर्तुळात त्यांचा मोठा मित्रवर्ग होता. डांडी कोठी की छाव, जीवनगंगा, साधना के स्वर आणि जिंदगीके तेवर हे ४ कविता, गजलसंग्रह त्यांचे विशेष चर्चेत आले होते.
416 total views, 1 views today