दख्खनच्या राणीचा राजेशाही प्रवास

पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच  दि. १५.८.२०२१ पासून – दि. ८.८.२०२१ पासून बुकिंग सुरू

मुंबई – पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसचा प्रवास आता राजेशाही होणर आहे. पुणे मार्गावर धावणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये  व्हिस्टाडोम कोचच्या मोठ्या खिडक्या असून छतावर पारदर्शक काच बसविण्यात आली आहे, जी १८० अंश फिरवता येते. म्हणजेच  आपल्याला हवे असल्यास आपण सीटसह मागे फिरू शकतो. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती कि,२६ जूनपासून मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस विशेष मध्ये निसर्गरम्य दृश्यांचा आस्वाद घेत प्रवास सुखकर होणार आहे. या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना हा क्षण अविस्मरणीय ठरणार आहे. 

व्हिस्टाडोम  कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये तयार केले आहेत. या काचेची खास अशी रचना केली आहे कि १८० किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेल.या कोचमध्ये प्रवास करताना प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवरून बाहेरील रम्य दृश्य पाहू शकतील. वय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली आणि सरकणारे दरवाजे  आकर्षणाचा भाग ठरतील.   व्हिस्टाडोम कोचच्या खिडक्या मोठया काचेच्या असून छतावर पारदर्शक काच बसविण्यात आली आहे. जी १८० अंश फिरवता येणार आहे. आपल्याला हवे असल्यास आपण सीटसह मागे फिरू शकतो. कोचमध्ये ओब्जेर्वेशन लाऊंज बनविण्यात आले आहे.इथे उभे राहून बाहेरील निसर्गरम्य दृश्यांचा आस्वाद घेता येईल. या कोचमध्ये स्वच्छता गृहेही अत्याधुनिक बनविण्यात आली आहेत.   विशेष डेक्कन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून रोज  सकाळी ७ वाजता सुटेल आणि पुण्यात दुपारी ११ वाजता पोहचणार आहे. तसेच पुण्याहून दुपारी ३.१५ वाजता सुटणार असून शिवाजी महाराज टर्मिनस येथे संध्याकाळी ७.०५ पर्यंत पोहचणार आहे.  

 4,761 total views,  23 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *