
ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या एका दुचाकीला गुरुवारी पहाटे ६.१५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोरील भीम नगर येथील अनुग्रह हॉटेल आणि अलैन्स बिर्याणीच्या बाजूला ही घटना घडली. येथे उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की काही वेळातच दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच वागळे अग्निशमन केंद्राचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दुचाकीला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली.




मात्र, या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमा,णात नुकसान झाले. ती पूर्णपणे जळून कोळसा झाली आहे. ही दुचाकी नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने आणि परिसरात गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. कोणालाही दुखापत झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तक नगर पोलिसांनी सांगितले.
7,225 total views, 3,213 views today