मध्य रेल्वेने जुलै २०२१ मध्ये ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली

रेल्वेमधून नवनवीन मार्गाद्वारे अधिक मालवाहतूक करण्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (BDU)  प्रयत्नशील आहे  

मुंबई – जुलै २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२५ दशलक्ष टन होती.  जुलै २०२१ मधील मालवाहतूक लोडिंगमध्ये जुलै २०२० च्या तुलनेत २५.४१% ची वाढ नोंदवण्यात आली. बीडीयूच्या पुढाकाराने जुलै २०२१ च्या महिन्यात ऑटोमोबाईलचे जवळजवळ ५१ एनएमजी रेक लोड झाले, ज्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिकरोड येथून २९ एनएमजी रेक, पुणे विभागातील  चिंचवडमधून २० एनएचएमजी रेक  आणि मुंबई विभागातील कळंबोली येथून २ एनएमजी रेक लोड झाले.  

मध्य रेल्वेच्या झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (BDUs) ने घेतलेले पुढाकार या अधिक मालवाहतुकीसाठी प्रामुख्याने  कारणीभूत ठरले आहेत.  हे “बीडीयू” विविध मालवाहक, नवीन ग्राहक, व्यापार संस्था आणि लॉजिस्टिक कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेतात.  या उपक्रमांमुळे रेल्वेकडे अनेक नवीन मालवाहतूक आकर्षित झाली आणि व्यापार आणि उद्योगाशी संबंध वाढला.  हे “बीडीयू” स्थानिक शेतकरी, लोडर, लॉजिस्टिक कंपन्या आणि वैयक्तिक नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे आक्रमकपणे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्या एकत्रित करतात.

 विभागवार  कामगिरी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जुलै २०२१ मध्ये १.३७ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदविली आहे, गेल्या वर्षीच्या १.२३ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत ११.३०% ची वाढ दिसून आली.  या वाढीचे श्रेय लोह व स्टील, खते आणि कंटेनरची झालेल्या उत्तम लोडिंगला आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जुलै २०२१ महिन्यात २.८७ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या २.१० दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांपेक्षा अधिक ३६.६७% इतकी वाढ नोंदवली आहे.  या विभागानतून केवळ कोळसा, सिमेंट क्लिंकर या पारंपारिक मालवाहतूक लोडिंग मध्ये चांगली कामगिरी दाखवली नाही तर कापुसाच्या गाठी, साखर आणि फ्लाय ॲश इत्यादीं नवीन मालाला आकर्षित केले.

 जुलै २०२१ मध्ये सोलापूर विभागाने ०.५४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या ०.४२ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत २७.५९ टक्क्यांनी वाढली आहे.  ही वाढ सिमेंट आणि साखर यासारख्या मुख्य मालाच्या चांगल्या लोडिंगमुळे झाली आहे.

 भुसावळ विभागाने ०.४४ दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या ०.४१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ७.३१% वाढ दर्शवते.  या विभागातील नाशिक येथून २९ एनएमजी रेक लोड केले आहेत जे आतापर्यंत नाशिकहून सर्वाधिक आहेत.

 पुणे विभागाने ०.११ दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या ०.०९  दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत  २२.२% वाढ दर्शवते.  बीडीयूच्या पुढाकाराने जुलै २०२१ मध्ये ऑटोमोबाईल लोडिंगचे २० एनएमजी रेक मालवाहतूकीसाठी मिळाले.

लवचिक योजना, कमी दर, वेगवान वाहतूक, संरक्षित व सुरक्षित वाहतूक आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणास अनुकूल असल्याने व्यापार आणि उद्योगजगत त्यांच्या माल आणि वस्तूंची रेल्वेने वाहतूक करण्यास अधिकाधिक इच्छुक आहेत.

 345 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.