ठाणे – कोकणात आलेल्या महाभीषण पुराने संपूर्ण महाड, चिपळूण आणि खेड वाहून गेला. ६५ जणांचे बळी गेले आणि हजारो कुटुंबांचे संसार महापुरात गेले आणि एकच हाहाकार उडाला. त्यातील चिपळूण येथे एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न गोराई प्रतिष्ठानचे संस्थापक शेखर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी केला.
महापूरमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कोकणी माणसांना पुन्हा उभे करण्याचे काम सुरु झाले असून राज्यातून मदतीचा ओघ वाढला आहे. त्यात गोराई प्रतिष्ठानांतर्फे १ ऑगस्ट २०२१ रोजी ३०० जणांना मदत देण्यात आली. त्यात जीवनावश्यक वस्तू, औषधे, सॅनटरी पॅड, पाण्याचे बॉटल, अन्न धान्य, साबण, कोलगेट, बिस्किटची पुडे, कपडे इ वस्तूंचा होता. ही सर्व पॅकेट्स समितीचे पदाधिकारी स्वतः चिपळूणमधील खेरडी आणि समर्थ नगर येथे वाटप केले. खासदार गोपाळ शेट्टी आणि उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदत घेऊन निघाले गेले. समितीचे संस्थापक शेखर शिंदे आणि अध्यक्ष नितिन माईल, कार्याध्यक्ष बिपीन उदेशी व मार्गदर्शक हेलन फोनसेका यांनी सर्व देणगीदार यांचे ज्यांनी आम्हाला वस्तु स्वरूपात तसेच अन्न-धान्य स्वरूपात मदत केली त्यांचे आभार मानले.
726 total views, 2 views today