दुबईतील अंतराळ परिषदेसाठी ठाण्यातील युवकांची निवड

ठाणे –  जगाला गवसणी घालणाऱ्या ध्येयवेड्या तरुणांची भारतात कमी नाही.आजवर अनेक भारतीय तरुण-तरुणींनी आपल्या सृजनशीलतेने जागतिक प्रतिभावंतात मानाचे स्थान मिळविले आहे. जगातील अनेक क्षेत्रात ठाणेकर विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिलेले आहे. संशोधनाची आवड असणाऱ्या  विविध महाविद्यालयातील ठाण्यातील तीन आणि दिल्लीतील एक अश्या चार विद्यार्थ्यांची दुबईत होणाऱ्या अंतराळ परिषदेसाठी एकमताने निवड करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (आयएएफ) ह्या फ्रान्समधील पॅरिसमध्ये स्थित एका अंतराळ अधिवक्ता गटातर्फे जगातील सर्वात मोठ्या अंतराळवीरावरील परिषद आयोजित केल्या जातात. यंदा दुबई मध्ये होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान भारतातील चार विद्यार्थ्यांना मिळाला आहे. 

या परिषदेत अक्षत मोहिते,  अभिजित कदम,  निशांत राणे, आणि  शिवम कुमार सिंह हे भारतीय विद्यार्थी ‘3 डी प्रिंटेड रॉकेट कंपोनंट्स आणि एअरजेलचे डिझाइन आणि औष्णिक विश्लेषण’ या विषयावर आपले दोन  शोध निबंध सादर करणार आहेत. या शोध निबंधाचे  यशस्वीरित्या सादरीकरण झाल्यानंतर त्यांचा लेख औपचारिकरित्या आयएएफ द्वारा प्रकाशित केला जाणार आहे. शिवम कुमार सिंग हा युवक स्पेसनोव्हा या कंपनीचा मुख्य संचालक असून “जगातील युवकांसाठी अंतराळ संशोधन” या संकल्पनेचा तो जगभर प्रसार आणि प्रचार या युवकांच्या मदतीने करीत आहे. अक्षत मोहिते हा युवक नासाच्या विविध प्रोजेक्टमध्ये कार्यरत आहे.संगीत क्षेत्रात स्वतःचे प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या अनेक वाद्ये निपुण असणाऱ्या अभिजित कदम स्पेसनोव्हा या कंपनीचा मुख्य मार्केटिंग अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. स्पेसनोव्हा या कंपनीच्या मुख्य आर्थिक संयोजक म्हणून निशांत राणे हा युवक यशस्वीपणे  जबाबदारी सांभाळत आहे. आपल्या देशातील युवकांना अधिकाधिक विज्ञानवादी बनवून भारत देशाचे नाव जगात उज्ज्वल करण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला आहे. 

ज्या विभागातर्फे हा उपक्रम राबवला जातो त्या विभागाला टीम स्पेसोनोवा असे म्हणतात. अंतराळात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही अंतराळ शिक्षण देणे हे टीम स्पेसोनोव्हाचे ध्येय आहे. विविध शास्त्रीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी धडपडणाऱ्या या युवकांमुळे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळेल  असा आशावाद अनेक मान्यवरांनी व्यक्त करून या चार युवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.