ठाणे महापालिकेची मालमत्ता कारत विक्रमी वसुली २६६.७५ कोटी जमा

ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता कराची विक्रमी वसुली माहे जुलै २०२१ अखेर रु. २६६.७५ कोटी कर जमा

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची माहिती

ठाणे – ठाणे महानगरपालिकेने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिनांक ३१ जुलै,२०२१ पर्यत मालमत्ता करापोटी विक्रमी वसुली करत रुक्कम रु.२६६.७५ कोटी इतका महसूल जमा केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

मागील सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता करासाठी दिलेल्या रु. ६५० कोटी अर्थसंकल्पिय इष्टांकानुसार माहे ३१ मार्च, २०२१ अखेरपर्यत रक्कम रु. ६०४.०१ कोटी इतका कर वसूल करण्यात आला आहे. सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात दिनांक ३१ जुलै,२०२० पर्यत रक्कम रु. ३६.११ कोटी कर वसूल झाला होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच माहे १ एप्रिल,२०२१ ते ३१ जुलै,२०२१ अखेर पर्यत २६६.७५ इतका मालमत्ता कर वसुल झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात  वर्षात सुमारे रक्कम रु.२३०.६४ कोटी इतका जादा कर वसूल झाला आहे.

तसेच जे करदाते थकीत रक्कमेसह चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या करासह दुस-या सहामाहिची रक्कम जमा करतील अशा  करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कराच्या देयकातील  सामान्य करामध्ये  सवलत देण्याबाबत (अली बर्ड योजना ) धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या  सवलत योजनेस करदात्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला असून, दिनांक ३१ जुलै, २०२१ पर्यत सुमारे १,८८,८१४ इतक्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

दरम्यान सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात नविन मालमत्तांना कर आकारणीच्या प्रभावाखाली आणण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. तरी नवीन मालमत्ताधारकांनी कर आकारणी करुन घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासह त्या-त्या प्रभाग समिती कार्यालयात जमा करावीत. तसेच नागरिकांनी थकीत मालमत्ता कर जमा करुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिककेच्यावतीने करण्यांत आले आहे.

 289 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.