भूमिपुत्रांच्या बांधकामांसाठी आगरी समाजाच्या शिष्टमंडळाची पालिका आयुक्त व महापौराशी चर्चा

ठाणे – अखिल भारतीय आगरी समाज परिषद च्या वतीने आयुक्त बिपीन शर्मा व महापौर नरेश म्हस्के यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर कारवाई करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठाणे महापालिका आगरी समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे का? असा सवाल करत अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर ती अधिकृत मध्ये चार चार माळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची तोडावीत अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.आता जी बांधकामे सुरू आहेत त्यावर कारवाई न करता भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दशरथ  पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, गुलाब वझे,अर्जुन बुवा चौधरी, गंगाराम शेलार, रोहिदास मुंडे, दशरथ भगत, डॉक्टर राजेश मढवी, मोतीराम गोंधली आदी उपस्थित होते

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.